Friday, 4 November 2011

गड किल्यांवर का जावे?

||श्री शिवरायाय नमः ||
छत्रपती शिवाजी महाराज कि... असे म्हटले कि तमाम मराठी जनांच्या तोंडून 'जय' असे जयघोष बाहेर पडतात.
परंतु खरंच महाराजांची ही मावळे आज राजेँचे विचार वेशीला टांगुन महाराजांचे विचार जणू पायदळीच तुडवतात.
"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या" असे वाक्य मोटार गाड्यांवर लावून अभिमानाने मिरवितो.
मात्र याच मोटरी बिअरबार,देशी दारुची दुकांना समोर पाहताना काय वाटत असेल राजांना........
अरे त्या विचारांचा नुसता देखावा नको..
मावळ्यांनी युद्धात जिँकून आणलेल्या एका सुंदर स्ञीला आपल्या मातेचा दर्जा दिला आमच्या महाराजांनी
मात्र आज हेच मावळे एखादि तरुणी समोरुन चालली तर किती घाणेरडे विचार मनात आणतात?..
महाराजांनी स्वराज्य रक्षणार्थ बांधलेले गड,किल्ले महाराष्ट्राची रत्ने आहेत.
आणि याच गडांवर महाविद्यालयीन तरुण-तरुणीँचे अतीशय गलिच्छ चाळे सुरु असतात,
गडाची स्वच्छता सोडाच पण आपल्या बरोबर आणलेल्या पदार्थाँचा कचरा,
शितपेयाच्या बाटल्या त्या गडाला जणू आंदण म्हणून भेटवस्तू देतात.
दगडांवर नाना प्रकारचे घाणेरडे विचार लिहुन आपली लायकि दाखवतात
कशाला आम्ही काल राजगडावर हि हेच चित्र पाहिलं .
शिवरायांचे धगधगते जिवनचरीत्र म्हणजे भारताच्या पिढ्यान पिढ्यांना अलौकीक
राज्यकर्त्याचे नित्य प्रेरणादायी आदर्श वस्तुपाठच आहे.
अश्या ह्या लोकोत्तर महापुरुषाचे कार्य आणि जिवनगाथा नविन
पिढीला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून बाहेर काढून अधीकाधीक शिकवायला
गड किल्यांवर जायला हवे.
एकंदरच या भरत भूमीला देवांच वरदान आहे 
जेव्हा जेव्हा तुम्ही सारे
संकटात सापडलं तेव्हा तेव्हा मी स्वतः (ईश्वर ) अवतार घेईन,,,,,
हो पण हे अवतार घेण ईतक सोप्प नाही नव्हत देखील ,,,,,
आणि याचा अनुभव या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घेतला होता .
मुसलमानांच्या जुलमाला सारेच कंटाळले होते त्याही वेळी
सार्यांना वाटत होत शिवाजी जन्माला यावा पण,,,,,,,,,,,,,
दुसर्याच्या घरात ,,,,, हि ब्याद आमच्या घरात नको .
नाही तर मोगलांचा छळ सहन करावा लागेल.

पण या सार्यात मत जिजाबाई वेगळ्या होत्या त्यांनी ह्या सार्या
गोष्टींचा अभ्यास केला होता
गड किल्ल्यांची ताकद माहित होती .मोहित्यांची जाधवांची भोसल्यांची
नाती अनुभवली होती विळ्या भोपळ्याचं नात अनुभवलं होत ,
सख्खे भाऊ  एकमेकांचे पक्के वैरी कसे होतात आणि तेही
छोट्या मोठ्या देशमुखीसाठी,,,?
वतनासाठी एकमेकांच्या उरावर बसणारे भावूबंद पहिले होते ,
हिंदूंच्या आय बहिणी मुसलमानांच्या जनान खाण्याच्या शोभा वाढवत होत्या .
राजरोस गायींच्या कत्तली केल्या जात होत्या ,
देवळ फोडली जात होती हिंदू नागवला जात होता पण ,,,,,,,,,
एकत्र होत नव्हता स्वतःचाच झेंडा मिरवण्यात धन्यता मनात होता.

बादशहाची तळी आणि मर्जी राखण्यात आयुष्य वेचत होता ,,,,
आणि हे सार त्या माऊलीला  सहन होत नव्हत आणि म्हणून मग
तिने या महाराष्ट्र भवानीला साकड घातलं,,,,,
आणि आई भवानी पुन्हा एकदा भक्ताचा हाकेला ओ देत आली,
जिजा बाईनी गजरच ईतका मोठा केला कि वरचा विठ्ठल खाली आला
आणि खालचा विठ्ठल भक्त  झाला ,,,,,,,,
पुन्हा एकदा पुण्याच्या पुण्यभूमीवर जिथे मुसलमान गाढवांचा नांगर 
फिरवत होते तिथे त्याच निर्भयतेने सोन्याचा नांगर फिरवला गेला,,,,,,
डोळ्यातल्या साठवलेल्या रागाच प्रतीकच जणू  छत्रपतीन  मध्ये अवतरलं होत,,,,,,
ईतक्या सहजासहजी नव्हते आले शिवराय,,,,,,
बर हि परंपरा फार पूर्वापार आहे
देवाने अवतार घेण नवीन नाही तुमची आर्तता किती मोठी ,,,?
तुम्हाला त्या गोष्टीची धग किती ,,?
सामाजिक बांधीलकीच भान किती,,?
सार्या सार्याची देव परीक्षा घेतो आळश्यांना  त्याने कधी मदत नाही केली आणि कर्तुत्ववाणांना कधी मागे नाही सारल,,,

बर हि परिस्थिती कायम होती महाराजांच्या आधीही
रामासाठी पुत्र कामेस्ठी यज्ञ करावा लागला
कृष्णाला नंदाच्या घरी वाढव लागल,,,
कुंतीचे पाच पांडव हि असेच नाही आले दुर्वास
ज्याचा लोकांना ईतका धाक होता कि दूर -वास व्हा दूर राहण्यास योग्य
अशा साधूचे काम करावे लागले,,
भीष्म ईतक्या सहजी नाही आले
हनुमंत ,ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ,
समर्थ रामदास ,
सारे सारे महाभाग ज्यांचे या भरत भूमीवर अनंत उपकार आहेत
ते सारेच एका ध्येयाने प्रेरित होवून आले होते
आणि तेच ध्येय होत जिजाबाई आणि राजे शहाजी यांचे ,,,
म्हणून श्री .शिवाजी महाराज जन्माला आले आणि भूमी
त्यांनी नीरयवन  केली म्लेन्छमुक्त केली ,,,,,,,

आज पुन्हा आपणाला या भरत भूमीला श्री.शिवाजी महाराजांची गरज आहे.
आपले सारेच नेते नाकर्ते आहेत हे आपल्याला हि ठावूक आहे
मग ह्या राष्ट्राप्रती आपल काही देण लागत का नाही?
रोग होवू नये यासाठी ईलाज करावा लागेल म्हणजे,,,,,
आपल्यात जिजामाता जागवावी लागेल
राजे शहाजी जागवावे लागतील,,,
तर आणि तरच देशाचा आणि पर्यायाने आपला

आपल्या मुलाबाळांचा उज्ज्वल भवितव्य घडवता येईल,,,,,,
लक्षात ठेवा छत्रपतीन सारखा नेता लाभला तर शेळ्या मेंढ्यांच
लाचार जीण जगणारी हि प्रजा तिने महाराजां नंतर हि
औरंगजेबास जेरीस आणल,,,,,,अटकेपार भगवा फडकवला
तेव्हा या सारे सारे
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर...?
घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...
तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही

महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काही करू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..

महाराजांचा इतिहास आज अमेरिका,फ्राँस,जपान, इग्लंड अगदि पाकिस्तानातील बहुसंख्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत आहेत
माञ आम्ही महारांचा रोज इतिहासातील एक एक घटना पुसत चाललो आहोत.
अहो अशाने राजेच काय परंतु एक मावळाही जन्मास येणार नाही ..
नुसते पुतळे चौकाचौकात उभे करुण ट्रँफिक जाम करण्यापेक्षा
आपल्या अंतरंगात व आचरणात राजांचे  विचार आत्मसात करा.
तरच त्या अनाम गडवीरांना आणि गड किल्यांना भेट दिल्याचा फायदा होईल.

Sunday, 24 July 2011

घोडखिंड झाली पावनखिंड ,,,2

||श्री शिवरायाय नमः ||
अफझल वधा नंतर महाराज निघाले विजापूरच्या रोखणे पुढे त्यांनी पन्हाळा घेतला.
विजापूरकर सततच्या पराभवाने चिडले होते.
मग पापी औरंग्याच्या मदतीने महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी एकी कडून
शाहिस्तेखान आणि दुसरीकडून सिद्धी जोहर महाराष्ट्रावर चालून आले.
मोंगल आणि विजापूरकर यांना एकाच वेळी आवरणे कठीण.
सिद्धी आणि शाहिस्तेखान दोघ एकत्र येण्या पूर्वी काहीतरी कारण आवश्यक होत.
आणि म्हणून ईकडे सिद्धीशी तहाची बोलणी अत्यंत मधाळ भाषेत सुरु झाली..
पूर्ण शरणागतीच पत्र हि गेल,,,
नेमका सिद्धी यालाच भुलला आणि त्याच्या कडे महाराजांच्या वकिलांच येन जन चालू झाल .
आणि मग गड पायाखाली घातला जावू लागला,,,
डोळ्यांनी शोधला जावू लागला  ,,
शिवरायांचे हेर सिद्धीच्या पहार्यावर लक्ष ठेवू लागले,,
एकंदरच वाटा घाटी मुळे पहारा ढिला पडू लागला,,,,,,
आणि याच बेसावध पणाचा नेमका फायदा महाराजांनी घेतला,,,,,
१२ जुलै रात्रीचा पहिला प्रहर किर्र काळोख
महाराज बाजी प्रभू आणि निवडक मावळ्यांसह निघाले राज दिंडीने
टेहळे अंधाराचा  वेध घेत होते,,,,,,,,,
पुढेमागे धारकरी ठेवून माराजांची पालखी चालली होती.
आणि अगदी तशीच आणखी पालखी निघाली त्यात महाराजांचं वेश धारण करून
"शिवा काशीद" बसला होता .
आषाढाचे दिवस घनदाट जंगल आणि पावसाळी वातावरण त्यात काळोख,,,,,,
मसाई पाठराजवळ दोन्ही पालख्या वेगळ्या झाल्या
शिवा काशीद ५० मावळ्यांसह मलकापूरच्या रोखणे निघाला,,,,,
आणि महाराज मसाई पठार चढले ,,
वादाल्वार्याची तमा न बाळगता पालखीचे भोई महाराजांची
पालखी पळवत होते,,,,,
आणि ईकडे शिवा काशीद चालला होता बायकोच कुंकू पुसून
मरणाला मिठी मारायला ,,,,,
ठरल्या प्रमाणे शिवा काशिदची पालखी  सिद्धीच्या पहारेकर्यांनी पहिली.
त्याला पकडण्यासाठी सिद्धीच सैन्य धावल लुटूपुटुची लढाई झाली
अर्थातच तोतया शिवाजी पकडला गेला,,,,,,
विजयाच्या उन्मादात सारे सारे गनीम त्याला पकडून
सिद्धीकडे गेले कुणीच आज पर्यंत महाराजांना पाहिलं नसल्या मुळे
सारे गाफील राहिले लगेच दिवाळी साजरी करण्याचा हुकुम देण्यात आला,,,
तोपर्यंत महाराजांना ओळखणारे बाजी घोरपडे आणि फाजलखान आले
मशालीच्या उजेडात त्यांना बाहेर येण्यास सांगण्यात आल,
आणि झाला प्रकार लक्षात आला........
बाजी घोरपडे आणि फाझलखान म्हणाले हा शिवाजी नाही,,,,,,
शिवा काशीद ने हि मग तशी कबुली दिली,,,,
आणि शिवा कशीद च मस्तक धडा वेगळ करण्यात आल,,,,,,
आपल्याला फसवण्यात आल खरा शिवाजी दुसय्रा मागणे पाळला हे त्यांच्या
लक्षात आल.....
मग पुन्हा फसवणूक होवू नये म्हणून आणि पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी
स्वतः फाझलखान आणि सिद्धी मसूद निघाला,,,,
बरोबर कर्नाटकी पायदळ पीड नाईक सोबत निघाले .
ईकडे महाराज मसाई आईला साकडे घालून कुंभारवाडी चापेवाडी,
खोतवाडी,करपेवाडी,आंबेवाडी,मालेवाडी, पाटेवाडी,,,,
मागे टाकत महाराज म्हसवड जवळ पांढर पाण्याजवळ आले.
आणि येथेच घात झाला,,,,,,
टेहळ्यांनी धावत येवून बाजी प्रभूस बातमी दली मलकापूर जवळून
घोड्यांच्या टापांचा आवाज येत आहे.
गनीम मागावर आला होता,,,,,,आता लगेचच हालचाल करावी लागणार होती,
बाजींनी निवडक धारकरी बाजूला काढले
सिद्धीच प्रचंड सैन्य रोखण हे आता त्याचं काम होत,,,,,
१३ जुलै पहाटेचा पहिला प्रहर,,,,,
सतंत धार लागून राहिली होती मधून मधून विजा कडाडत होत्या ...
सिद्धी समाजाला महाराज येथेच जवळपास कुठे तरी आहेत,,
समोर अनुस्कुरा आणि विशाळग सारासार विचार करून सिद्धी विशाल
गडा कडे वळला ,,,,,
घोड खिंडीत मग बाजींनी निर्णय घेतला,३०० मावळ्यांचा गट करून
बाकीचे मावळे पालखी सोबत ठेवले ,,,महाराज तुम्ही विशाल गडी निघा .
मी येथे गनिमाला थोपवतो,,,,,असे बाजी महाराजांना म्हणाले.
महाराज म्हणाले आम्ही गडावर पोचताच तोफांच्या ईशारति करू,
सिद्धी मसूद आणि फाझलखानच घोडदल खिंड उतरू लागल,,,,,,,,,
वरून फेसाळत येणारा ओढा जसा अंगावर कोसळतो तसेच हे सारे
धारकरी सिद्धीच्या सैन्यावर कोसळून पडू लागले,,,
हर हर महादेवची गर्जना करत मराठे वीर सिद्धीच्या सैन्याला भारी पडत होते .
कुठून होतो तेच सिद्धीच्या फौजेला कळत नव्हत,,,,
गोफणीतून दगड असे पडत कि तलवार उचलायला हात उठत नसे ,
घोडखिंड विजापुरी सैन्याच्या किंकाळ्यांनी भरून गेली .
तर कधी गडगडणार्या शिळा घोड्यांवर आदळत होत्या ...
त्या अरुंद जागेत घोडे आवरणे कठीण जात होते.
आणि मराठी सैन्याचा मागमूस लागत नव्हता,,,
पण हळू हळू विजापुरी सैन्य सावरल आणि मराठी मावळा
त्या घोडखिंडीत लढत होता पडत होता पण हटत नव्हता,,,,,,
कारण या मराठी सैन्याच्या मधोमध साक्षात शिवशंकर
बाजींच्या रुपात  हातात पट्टे घेवून तांडव करत होता
हळूं हळू मराठी फौजेची पीछेहाट होत होती
खूपशे कमी आले होते एक एक मावळा १०/१० जणांचे वार झेलत होता,
सारी खिंड रक्ताने न्हावून निघाली होती,,,,,
बाजी आवरला जात नाही पाहून कर्नाटकी पीड नाईक झुडूप आड झाला तिथून
बंदुकीची गोळी झाडण्यात आली,,गोळी बाजींच्या दंडास लागली,,,
पट्याचा एक हात थांबला,,,,,,,
विजापुरी सैन्याने बाजींची कोंडी केली,
तलवारीचे घाव बाजींवर पडले बाजी खाली पडले पण प्राण जात नव्हता,,,,
जीव घुटमळत होता, मराठ्यांचा प्रतिकार क्षीण झाला ,,,,आणि,,,,,,,,,
तितक्यात तोफांचा आवाज झाला,,,,,,,,,आणि बाजींनी देह ठेवला.
विजापुरी सैन्य विशाल गडाकडे निघाले
खिंडीत प्रेतांचा खच पडला होता,,,,,,
सैन्य विशाल गडाकडे गेल्यावर मराठी सैन्यांनी बाजींचा देह उचलला ,
महाराजांना बाजी पडल्याची बातमी कळली
महाराज म्हणाले आज घोडखिंड पावन
खिंड झाली 


Saturday, 23 July 2011

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला ,,,,,,,,१

||शिवरायाय नमः ||
कळीकाळालाही आव्हान द्यायला तयार असणारे  मावळे ,छ्त्रपतींसाठी मृत्यूलाही कवटाळनारे शिवाकाशीद,आणि रात्रीच्या त्या घोर अंधारात महाराजांना पालखीत बसवून सुखरूप विशाळगडी पोहचवणारे सारे पालखीचे भोई ,,,,,
आणि ,,,,,
साक्षात मृत्यूलाही जरा थांब माझा धनी गडावर पोहचला नाही तोपर्यंत ,,,,
मी मारणार हि नाही असे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या
पराक्रमाला वंदन करण्यासाठी आम्ही सारे या भूतलावरचे आजचे मावळे
आई भवानीच्या आशीर्वादाने हो तिच्याच आशीर्वादाने
नाहीतर नेमक आम्हालाच का या पायवाटेवर चालायचं भाग्य मिळाव ?
शिवशौर्याला प्रणाम करायला नियतीने आमचीच निवड का करावी?
खरतर शाळेत शिकवलं होत. ,,,,,,
पन्हाळ्याला सिद्धी जोहरने वेढा घातला होता ,
महाराज त्या वेढ्यातून निसटले त्यासाठी शिवा न्हावी तोतया शिवाजी बनून गेला
आणि सिद्धीने त्याला पकडलं आणि मग खाराप्रकार लक्षात आल्यावर
त्याला मारून टाकल ,,,,,,
पुढे मग तो महाराजांच्या पाठलागावर निघाला आणि
घोडखिंडीत मग बाजी प्रभू माराजांना म्हणाले तुम्ही पुढे व्हा  मी पाहतो
आणि घोर रणसंग्राम झाला त्यात बाजी प्रभू कामी आले
तोफांचा आवाज ऐकल्यावर त्यांनी आपला देह ठेवला,,,,,,,,,,,,
खरच हा सारा ईतिहास असा चार ओळीत सांगता येईल,,,,,,,,,,,,,,,,?
आणि हेच शिवशौर्य समजून घेण्यासाठी आम्ही निघालो
१३.७.११ रोजी रात्री सकाळी आम्ही ज्योतिबाच दर्शन घेतलं
आणि पन्हाळ्यावर आलो पन्हाळा दर्शन घेतलं आणि निघालो
त्या वाटेवर ज्या वाटेवरून साक्षात महाराज आणि त्यांचे मावळे
३५१ वर्षापूर्वी गेले होते आणि मग हळू हळू लक्षात येवू लागल
कमरेचे काटे ढिले पडू लागले ,,,,
मांड्या पोटर्या भरून आल्या ,,,
ढुंगनाच भज झाल पडून पडून पाय घसरून
हाड खिळ खिळी झाली ,,,,,,
बर आमच्या कडे ना ओझ न काही त्रास
त्रास सोसण्यासाठी बस होती आमच समान वाहून आणत होती.
मुक्कामी आयत तेही सुंदर जेवायला मिळत होत ,,,,,
झोपायला मस्त पैकी स्लीपिंग ब्याग होती ,,,,
आणि तरीही आम्ही थकत होतो,,,,,,,,,,,,,,,,?
आणि सहजच मनात विचार आला या सार्या सुविधा त्या काळी महाराजांकडे असतील,,,,,,,,,?
आणि त्या शिवशौर्याने  आम्हाला जाग केल ,,,,,,,,
जिथे आमची आमची ईच्छा ताकद हिम्मत हात टेकते 

नेमकी तिथेच ,,,,,,,,,
महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची निष्ठा या सार्या वर मात करून
पुढे जे यशस्वी होते आणि त्यातून निर्माण होत स्वराज्य,,,,,,,,,,,,,,

आणि सार समजून घेण्यासाठी मात्र  या वाटे वर गेलच पाहिजे
त्या शिवशौर्याचा अनुभव घेतलाच पाहिजे,,,,,,
धर्मशास्त्र  सांगत ३ गोष्टी नित्य नूतन ,,,,,
१- रामायण महाभारताची कथा
२- सूर्योदय सूर्यास्त
३-स्वतःची पत्नी
पण गेली १० वर्षे या वाटेवर चालल्यावर लक्षात आल ,,,,,,,,
ईतिहासाच गुणगान,,,,
शिवप्रतापाच गायन,,,
आणि  
या सार्यांच्या शिवशौर्याच्या कथा ,,,,,ह्याच नित्य नूतन आहेत असो,

तारीखवार बोलन हा माझा स्वभाव नाही आणि विषयही नाही त्यामुळे हा
सारा पराक्रम ज्या भूमीत घडला तो मी तारीखवार नही सांगणार करणं मी संशोधक नाही अभ्यासक तर मुळीच नाही माझा स्वतःच अनुभव सांगतो सनावळीत अडकलेला
ईतिहास वाचताना माणूस नेहमी नापास होतो,,,,,,,,,,
महाराजांचं कार्य कर्तुत्व राहत बाजूला
आणि त्यांच्या जन्म मरणाचा वाद होत राहतो

छत्रपतींवर बोलयला सुरवात केली आपण हमखास बोलतो
अरे त्यांचा सेनापती मुसलमान होता ,विश्वासू मदारी मेहतर होता ,,,
मग आपसूकच त्यांना सर्व धर्म समभावाच्या देव्हार्यात बसवतो,,,,,,
महाराज कसे धर्म निरपेक्ष होते ते चित्र समोर ठेवतो
खरतर सर्वधर्म समभाव म्हणजे ,,,
"ज्या सर्व धर्मांमध्ये समानतेचा आभाव आहे " तो ,,,,,,

महाराजांची धर्मनिरपेक्षता अशी होती कि मी तुमच्या मशिदींना हात
लावणार नाही पण,,,,? आमची
देवळ पाडून त्याच्या मशिदी केल्या असतील तर ,,,?
त्या मशिदी पडून मी
देवळ बांधणारच त्यासाठी कुणाची परवानगी घेणार नाही राम खरच येथे होता का?
नाहीतर अस कारण येथे हॉस्पिटल बांधा,,,वारे धर्मनिरपेक्षता?
या असल्या बेगडी धर्मनिरपेक्षतेची महाराजांना लाजच वाटत असेल ,,,
अगदी कालपरवाच कसाब काय किवा १३ ची बॉमस्पोट  मालिका काय,,,
सरकार अजूनही कारवाईच्या विचारात आहे तर कुणी फरारी आहे ,,,,
कुणी काहीही बोलत नाही मात्र जे तावातावाने अन्न आणि  रामदेव बाबाला पाठींबा देत होते .
बर पाठींबा म्हणजे काय तर एक मिस्स कॉल ,,,,,,,,,,,,,,,,,
आज ज्या वाटेवर चालतोय त्या वाटेवर असाच मिस्स कॉल महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी दिला असता तर,,,?
आज जे सुख उपभोगतोय ते उपभोगायला तरी मिळाल असता का?
कोण कुठला अमित मेंगळे त्याला या वाटेवर आपल्याला घेवून यायचं सुचल तरी असत का?
फेसबुकवर आज बाजींची जयंती, पुण्यतिथी ,विशाल संग्राम अस काही अपडेट्स टाकल्या असत्या ,,,,,,,

सांगायचं ईतकच ताज ओबेरायजवळ मेणबत्या पेटवून आमची राष्ट्रभक्ती नाही साजरी होत .
छत्रपतींच्या बाजींच्या शिवशौर्याची हि शिकवण नाही,,,,,,,,,,
लढाईत शत्रूला मारून मग नाईलाज झाला तरच मरा,,,
न कि एक गाल मग दुसरा गाल असा खेळ खेळा,,,

हि शिकवण आहे अहिंसेची शिवशौर्याची  ,,,,,,,
अपशकुनाला शकुनात बदलत ते शिव शौर्य,,,,,,
त्यांना माहित होत देवाला आता दह्या दुधाचे अभिषेक खूप झाले
आता त्याला रक्ताचा अभिषेक हवाय तो हि शत्रूच्या ,,,
आणि ३२ दातांच्या बोकडाचा बळी दिलाही

पहा जरा आपली सारी दैवत शास्त्र सज्ज आहेत
हात जोडून नाहीत,,,,
परंतु देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल,,,,,
हे त्रिकाल अभादित असत्य आम्ही मनावर ईतक कोरून घेतलं कि
महाराजांचा ईतिहास हि येथे फिका पडावा,,,

आम्ही फक्त निषेध करतो आणि स्वस्थ बसतो .
आमची ईति कर्तव्यता संपते सामाजिक बांधिलकी संपते.
महाराजांच्या ईतिहासात डोकावलं तर लक्षात येईल रामाला जशी वानरसेना मिळाली
तशीच असंख्य निष्ठ्वान मावळ्यांची फौज महाराजांना मिळाली ,,,,,,
आणि या सार्या मावळ्यांचा सेनापती शोभावा असा शिवा काशीद,,,,,,
पन्हाळ्यावरून निसटताना  सिद्धी जोहरच्या हाती लागला ,
त्यांनी लगेचच दिवाळी साजरी केली सिवा हाती लागला
प्रत्यक्ष शिवाजीला कैद केल.........
ते हि जिंदा परंतु थोड्याच वेळात महाराजांचं हा डाव त्यांच्या लक्षात आला .
ते सावध झाले त्या नकली शिवाजीच्या छाताडावर तलवार टेकवून त्याला
विचारलं बोल सिवा कहा गया ,,,,,,?
खर खर सांग नाहीतर,,,,,,?
नाही तर ? नाही तर काय?
आर जीव गेला तरी बी सांगणार नाय तुला महाराज कुट गेल्ये ,,,,,
मला मरणाची भीती दवातोस ?
आर ह्या अंगावर महाराजांची कापड चढवली आन म्या पावन झालो
माझ्या राजा साठी म्या हजारदा मारायला तयार हाय
तू र काय मला मारणार?
जावा ह्ये कापड चढवल तवाच माझ्या बायकोच्या कपाळाच कुकू पुसून आलो
तू काय मला मारणार?
ह्ये महाराजांची कापड चढवली आन म्या हजार जलम जगलो
आर या फूड निष्ठावंतांची जवा कवा महाराज
यादी बनवतील तवा माज नाव सर्वात वर असाल तू र काय मला मरणाची भीती दवातोस? मला मारलास तरी बी जिवंतच राहीन

जगायला काय र कुत्री मांजरी बी जगत्यात आणि त्यातच सिद्धी जोहरने
खचकन तलवार शिवाच्या छाताडात खुपसली
शिवा पडला पडता पडता ईतर मावळ्यांना म्हणाला
मित्रांनो आपल्या राजाला सांगा शिवा शत्रूला पाठ दाखवून न्हाई पळाला छातीवर घाव झेलला महाराजांना सोबल असाच मेला  ,,,,,,,

या सिद्याला झुलवायला जो येळ मिळाला म्या धन्य झालो
पावन झालो माझ्या आयुष्याच सोन झाल.
आता वर देवाला ईचर्नार हाय म्या राजांवर ओवाळून टाकायला मला एकच जलम का दिला ?
हि होती निष्ठा शिवशौर्याची ,,,,,,,,
आणि सिद्धी पाठलागावर निघाला
पांढरपाण्यापाशी  गाठ पडली आता मोठी पंचाईत झाली पुढे काय करायचं ?
बाजी म्हणाले महाराज तुम्ही पुढ व्हा
३०० मावळे माझ्या पाशी ठेवा मी घोड खिडीत त्यांना अडवतो
तुम्ही विशाळगडी पोहचताच ईशारति करा
मी मागो मग येतोच पण,,,,,,,
हे सार ईतक सोप्प नव्हत केवळ ३०० मावळे घेवून
सिद्धीच्या फौजेशी लढण सोप्प नव्हत....
पण बाजी लढले कळी काळाच्या हि उरात धडकी बसेल
अशा आवेशात लढले साक्षात मृत्यूने त्या घोड खिंडीत तांडव घातल,,,
सिद्धीला बाजीला थोपवण भारी जात होत आणि
काळान डाव साधला
बंदुकीची गोळी वर्मी लागली
आधीच जखमांनी बाजींच्या देहाची चाळण उडाली होती .
परंतु विशाल गडावरून काही ईशारति होत नव्हत्या
आणि बाजींच देह काही केल्या खाली पडत नव्हता
पराक्रमान हि लाजून तोंडात बोट घालाव असा पराक्रम बाजी गाजवत होता
आणि महाराज गडावर पोहचे ईशारति झाली तोफांचे आवाज ऐकले
आणि बाजींनी देह ठेवला
घोड खिंड पावन खिंड झाली बाजींच्या रक्तान पावन झाली
बाजींच्या निष्ठेने पावन झाली.