Friday, 9 March 2012

सुधागड


ठरल्या प्रमाणे १७ तारखेला आम्ही रात्री १२ वाजता निघालो आणि पहाटे पहाटे सुधागडला पोहचलो 

सकाळ असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते.
गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी.

सुधागड किल्ल्याला ऐतेहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील 
म्हणतात. सुधागड म्हणजे भोर 
संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार 
प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या 
गडाला भोरपगड असेही म्हणत 
असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे 
संस्थापक श्री शिवछत्रपतींचा 
पदस्पर्श या गडाला झाला आणि 
याचे नाव सुधागड ठेवले गेले. या 
गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड 
विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा 
आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. 
या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, 
ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा 
देखील तितकाच जुना किल्ला असावा. 
पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. 
याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली 
हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 
'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी 
भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर 
चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास 
संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. 
बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून 
किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार 
कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे 
भोरपगडावरूनसुधागड असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व 
औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या 
अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी 
आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या 
सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या 
परली गावात हत्तीच्या पायी दिले.
पहाण्यासारखी ठिकाणे

या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर 
पाण्याचे अनेक तलाव 
आढळतात.गडावर पंत सचिवांचा 
वाडा आहे.तसेच भोराई देवीचे 
मंदिर 
आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. 
आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात 
अनेक प्रकारची औषधी वनस्पती 
आढळतात. गडावरील पंत 
सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे 
गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. 
सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई 
देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे 
पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 
टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट 
मात्र आता अस्तित्वात नाही.
  • पाच्छापूर दरवाजा : या 
  • दरवाज्यातून गडावर 
  • शिरल्यास थोडे चढल्यावर 
  • आपण एका पठारावर 
  • पोहोचतो. पठाराच्या डावीकडे 
  • सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच 
  • धान्यकोठारं,भाडांचे 
  • टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ 
  • आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
  • गडावरील टकमक टोक : 
  • वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. 
  • ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. 
  • या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. 
  • या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा 
  • घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

चोर वाट 
  • दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे 
  • या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची 
  • रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन 
  • भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या 
  • द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. 
  • गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट 
  • विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
    भोराई देवी
  • सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
  • नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.
किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ २\२.५ तासात किल्ला सर् केला. आर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते, चढायला खुपच सोप्पी आणि सेफ अशी शिडी आहे.
फोटो काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. काही वेळातच आम्ही वर आलो. किल्ला तसा खूप प्रशस्त आहे. तसेच किल्ल्यावर जुने बांधकाम् आढळते. वरती टकमक टोक, शिव मंदिर, पाण्याचे तळे, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आहे. किल्ल्याला बुरुज आणि चोरवाटा आहेत.माहिती मिळाल्याप्रमाणे दरवर्षी सुधागडावर भोराई देवीची यात्रा होते.

सकाळी अंदाजे१० वाजता वरती असलेल्या वाड्यात चहा आणि जेवण केले. (वर वाड्यात चहाची सोय होते.)
आणि गड फिरायला निघालो दुपारी साधारण २\३ वाजता जेवण संध्याकाळी टकमक आणि सूर्यास्त आणि
रात्री मुक्काम करून सकाळी गड उतरलो
मग पाली गणेश दर्शन आणि उंबरखिंड पाहून संध्याकाळी घरी परतलो
येथे सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा 
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=108997132899458184080&target=ALBUM&id=5712033364431272353&authkey=Gv1sRgCOiAxoHKy9qMHQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
येथेहि सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा

 https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=103673941569844814606&target=ALBUM&id=5711251137954960897&authkey=Gv1sRgCNblyY_g5vzXZQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.

Monday, 16 January 2012

जव्हार-भूपतगड


||श्री शिवरायाय नमः ||
जिथे साक्षात छत्रपतींनीही जायच्या आधी विचार केला असता
तिथे ईतर मुसलमान राजांनी स्वप्नात सुद्धा तिथे जाण्याचा विचार केला नेसल असा हा गड भूपत गड ,,,
मुंबई जवळ असूनही दुर्गम भाग सहज जावू याचा विचारही कुणी
करू नये असा हा भूपत गड,,
ईथे खरतर मला गडाची माहिती देण्यापेक्षा ईतर माहिती द्यावीशी वाटते
"माझ्या कडे  फाटके बूट होते वापरायला आणिते फाटके बूट
घालायला धड पाय हि नाहीत अशी अवस्था असलेला हा भूपत गडचा
जव्हार मधील दुर्गम भाग,,,
आपल्याकडे फाटके असले तरी कपडे आहेत घायला पण मुंबई जवळच्या त्या
साऱ्या आदिवसी पाड्यातील लोकांकडे ते कपडेही नाहीत
आपल्या कडे शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत त्यांच्या कडे त्या मुलभूत गरजा भागवायला महाग आहेत
आपल्या कडे दात आणि चणे हि आहेत .
त्यांच्या कडे दातही नाही आणि चणेही नाहीत आणि तरीही आम्ही जेव्हा फिरलो
मुकबधीर शाळेच्या प्रमिला कोकड ज्यांचा या कार्याचा गौरव
देशाच्या राष्ट्रपतीं "प्रतिभा ताई पाटील "हातून झाला आहे,
तिथल्या मुकबधीर शाळेत तेव्हा असे वाटले आपणच खरे मुकबधीर आहोत
आपल्या जवळच्या जिल्ह्यात ह्या मुलभूत गरजा नाहीत आणि
आपण मूक राहतो आणि त्यांच्या जाणीवां विषयी बधीर हि आहोत ,,,
त्यांचे कलाकुसूर करणारे हात पहिले कि आपल्याला आपल्याच हातांची लाज वाटते
आपल्या हात किमान त्यांच्या साठी देवाकडे प्राथना करण्यासाठी साठी जरी जोडले
तरी जन्माच सार्थक होईल असे वाटते ,,
आणि देवबांधचे साठे काका वयाची ६० ओलांडली तरी नव्या उत्साहाने आम्हाला
ते करत असलेल्या कार्याची माहिती करून देत होते आणि हे सार सांगताना कुठेही अस जाणवत नव्हत
कि आमच्या कडे मदत मागत आहेत ,,,
वर आम्ही तिथे दुपारी पोहोचलो तर आमच्या साठी तिथे मांडव घातला होता
सतरंज्या अंथरल्या होत्या थंडगार पाण्याची व्यवस्था होती
ज्या गावात रात्री मुक्काम केला होता
तिथे तर आम्ही येणार म्हणू रस्ता स्वच्छ केला होता
पाण्याने शिंपडून सरळ केला होता
आणि आपण सारे अनास्थी ,,,,
स्वातंत्र्याच्या ६० वर्ष नंतरही त्यांच्या तेथील आदिवासींच्या जीवनात
स्वातंत्र्याचा सूर्य पोहचलेला नाही हे तिथे गेल्यावर कळत,,,
चार बांबुचे पाल हीच त्यांची मालमत्ता ,

शिकवायला धड शिक्षणही नाही त्यांच्याच गावातील सर्वात जास्त
म्हणजे १२ पास झालेला माणूस हाच त्यांचा शिक्षक ,,
आरोग्य सुविधा कशाशी खातात हे त्यांना माहित नाही,,
असा हा भूपतगड आणि त्याचाह परिसर ईकडा तरी अनुभवावा
जव्हार मोखाडा मार्गावर देवबांध,,,
जव्हार किंवा खोडाल्याहून बसने ईथे याव पुढे नदी ओलांडून डावीकडे
एक कच्चा रस्ता फुटतो मग आडोशी गाव,,,
तिथून पुढे पाथर्डी आणि गावात शिरल कि भूपत गडच मनोहारी दर्शन होत ,,
असे ३\४ वेळा नदी ओलांडावी लागते,
तिसर्यांदा नदी ओलांडली कि दिसते कुर्लोदची वाडी कुर्लोद हे भूपत गडच्या
पायथ्याच गाव ईथूनच झाप या गावी हि जाता येत,
तास जव्हार हून थेट कुर्लोद्लाहि येत येत,
गडाच्या टोकाकडे चालत निघाव
वर पोहचल्यावर उजव्याबाजूला एक उंचवटा दिसतो,
थोड पुढ गेल्यावर काही जोती व त्यानंतर देवाची खोपी दिसते,
त्याला लागूनच गडाच्या मूळच्या दरवाजाचे अवशेष दिसतात,
त्याच्या थोड पुढे लहानसं तळ दिसत हे सार बघून मग मागे वळायच कुर्लोदची
वाट सोडून झाप कडे चालू लागायचं खाली उतरल्यावर झाप हून
एसटी ने जव्हार मग मुंबई गाठायची
मुंबईला आलो खरा पण तिथले आदिवासी काही डोक्यातून जात नव्हते
खरतर मुंबई जवळ आदिवासी पाडा ,गाव,जिल्हा  ? हेच मुळात मान्य होत नाही,
तिथे हे सारे आदिवासी राहतात ज्याच्याकडे वीज नाही पाणी नाही
पण मनाची श्रीमंती ईतकी आहे कि विचारू नका शब्द नाहीत .

ईतिहासाच हे छुप पान उघडलं गेल दुर्लक्षित भाग समोर आणला
अशा ह्या भूपत गडाची मोहीम शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राबवली गेली ,
आणि त्याला श्री.श्रीदत्त राउत यांनी मोलाची साथ दिली
धन्यवाद शतशः धन्यवाद .

खालील  लिंक वर क्लिक केले तर जव्हार भूपतगडाचे  फोटो दिसतील.
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5690886827952087585&authkey=Gv1sRgCNmqg-WuqtbuBw&feat=एमैल

Friday, 4 November 2011

गड किल्यांवर का जावे?

||श्री शिवरायाय नमः ||
छत्रपती शिवाजी महाराज कि... असे म्हटले कि तमाम मराठी जनांच्या तोंडून 'जय' असे जयघोष बाहेर पडतात.
परंतु खरंच महाराजांची ही मावळे आज राजेँचे विचार वेशीला टांगुन महाराजांचे विचार जणू पायदळीच तुडवतात.
"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या" असे वाक्य मोटार गाड्यांवर लावून अभिमानाने मिरवितो.
मात्र याच मोटरी बिअरबार,देशी दारुची दुकांना समोर पाहताना काय वाटत असेल राजांना........
अरे त्या विचारांचा नुसता देखावा नको..
मावळ्यांनी युद्धात जिँकून आणलेल्या एका सुंदर स्ञीला आपल्या मातेचा दर्जा दिला आमच्या महाराजांनी
मात्र आज हेच मावळे एखादि तरुणी समोरुन चालली तर किती घाणेरडे विचार मनात आणतात?..
महाराजांनी स्वराज्य रक्षणार्थ बांधलेले गड,किल्ले महाराष्ट्राची रत्ने आहेत.
आणि याच गडांवर महाविद्यालयीन तरुण-तरुणीँचे अतीशय गलिच्छ चाळे सुरु असतात,
गडाची स्वच्छता सोडाच पण आपल्या बरोबर आणलेल्या पदार्थाँचा कचरा,
शितपेयाच्या बाटल्या त्या गडाला जणू आंदण म्हणून भेटवस्तू देतात.
दगडांवर नाना प्रकारचे घाणेरडे विचार लिहुन आपली लायकि दाखवतात
कशाला आम्ही काल राजगडावर हि हेच चित्र पाहिलं .
शिवरायांचे धगधगते जिवनचरीत्र म्हणजे भारताच्या पिढ्यान पिढ्यांना अलौकीक
राज्यकर्त्याचे नित्य प्रेरणादायी आदर्श वस्तुपाठच आहे.
अश्या ह्या लोकोत्तर महापुरुषाचे कार्य आणि जिवनगाथा नविन
पिढीला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून बाहेर काढून अधीकाधीक शिकवायला
गड किल्यांवर जायला हवे.
एकंदरच या भरत भूमीला देवांच वरदान आहे 
जेव्हा जेव्हा तुम्ही सारे
संकटात सापडलं तेव्हा तेव्हा मी स्वतः (ईश्वर ) अवतार घेईन,,,,,
हो पण हे अवतार घेण ईतक सोप्प नाही नव्हत देखील ,,,,,
आणि याचा अनुभव या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घेतला होता .
मुसलमानांच्या जुलमाला सारेच कंटाळले होते त्याही वेळी
सार्यांना वाटत होत शिवाजी जन्माला यावा पण,,,,,,,,,,,,,
दुसर्याच्या घरात ,,,,, हि ब्याद आमच्या घरात नको .
नाही तर मोगलांचा छळ सहन करावा लागेल.

पण या सार्यात मत जिजाबाई वेगळ्या होत्या त्यांनी ह्या सार्या
गोष्टींचा अभ्यास केला होता
गड किल्ल्यांची ताकद माहित होती .मोहित्यांची जाधवांची भोसल्यांची
नाती अनुभवली होती विळ्या भोपळ्याचं नात अनुभवलं होत ,
सख्खे भाऊ  एकमेकांचे पक्के वैरी कसे होतात आणि तेही
छोट्या मोठ्या देशमुखीसाठी,,,?
वतनासाठी एकमेकांच्या उरावर बसणारे भावूबंद पहिले होते ,
हिंदूंच्या आय बहिणी मुसलमानांच्या जनान खाण्याच्या शोभा वाढवत होत्या .
राजरोस गायींच्या कत्तली केल्या जात होत्या ,
देवळ फोडली जात होती हिंदू नागवला जात होता पण ,,,,,,,,,
एकत्र होत नव्हता स्वतःचाच झेंडा मिरवण्यात धन्यता मनात होता.

बादशहाची तळी आणि मर्जी राखण्यात आयुष्य वेचत होता ,,,,
आणि हे सार त्या माऊलीला  सहन होत नव्हत आणि म्हणून मग
तिने या महाराष्ट्र भवानीला साकड घातलं,,,,,
आणि आई भवानी पुन्हा एकदा भक्ताचा हाकेला ओ देत आली,
जिजा बाईनी गजरच ईतका मोठा केला कि वरचा विठ्ठल खाली आला
आणि खालचा विठ्ठल भक्त  झाला ,,,,,,,,
पुन्हा एकदा पुण्याच्या पुण्यभूमीवर जिथे मुसलमान गाढवांचा नांगर 
फिरवत होते तिथे त्याच निर्भयतेने सोन्याचा नांगर फिरवला गेला,,,,,,
डोळ्यातल्या साठवलेल्या रागाच प्रतीकच जणू  छत्रपतीन  मध्ये अवतरलं होत,,,,,,
ईतक्या सहजासहजी नव्हते आले शिवराय,,,,,,
बर हि परंपरा फार पूर्वापार आहे
देवाने अवतार घेण नवीन नाही तुमची आर्तता किती मोठी ,,,?
तुम्हाला त्या गोष्टीची धग किती ,,?
सामाजिक बांधीलकीच भान किती,,?
सार्या सार्याची देव परीक्षा घेतो आळश्यांना  त्याने कधी मदत नाही केली आणि कर्तुत्ववाणांना कधी मागे नाही सारल,,,

बर हि परिस्थिती कायम होती महाराजांच्या आधीही
रामासाठी पुत्र कामेस्ठी यज्ञ करावा लागला
कृष्णाला नंदाच्या घरी वाढव लागल,,,
कुंतीचे पाच पांडव हि असेच नाही आले दुर्वास
ज्याचा लोकांना ईतका धाक होता कि दूर -वास व्हा दूर राहण्यास योग्य
अशा साधूचे काम करावे लागले,,
भीष्म ईतक्या सहजी नाही आले
हनुमंत ,ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ,
समर्थ रामदास ,
सारे सारे महाभाग ज्यांचे या भरत भूमीवर अनंत उपकार आहेत
ते सारेच एका ध्येयाने प्रेरित होवून आले होते
आणि तेच ध्येय होत जिजाबाई आणि राजे शहाजी यांचे ,,,
म्हणून श्री .शिवाजी महाराज जन्माला आले आणि भूमी
त्यांनी नीरयवन  केली म्लेन्छमुक्त केली ,,,,,,,

आज पुन्हा आपणाला या भरत भूमीला श्री.शिवाजी महाराजांची गरज आहे.
आपले सारेच नेते नाकर्ते आहेत हे आपल्याला हि ठावूक आहे
मग ह्या राष्ट्राप्रती आपल काही देण लागत का नाही?
रोग होवू नये यासाठी ईलाज करावा लागेल म्हणजे,,,,,
आपल्यात जिजामाता जागवावी लागेल
राजे शहाजी जागवावे लागतील,,,
तर आणि तरच देशाचा आणि पर्यायाने आपला

आपल्या मुलाबाळांचा उज्ज्वल भवितव्य घडवता येईल,,,,,,
लक्षात ठेवा छत्रपतीन सारखा नेता लाभला तर शेळ्या मेंढ्यांच
लाचार जीण जगणारी हि प्रजा तिने महाराजां नंतर हि
औरंगजेबास जेरीस आणल,,,,,,अटकेपार भगवा फडकवला
तेव्हा या सारे सारे
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर...?
घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...
तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही

महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काही करू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..

महाराजांचा इतिहास आज अमेरिका,फ्राँस,जपान, इग्लंड अगदि पाकिस्तानातील बहुसंख्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत आहेत
माञ आम्ही महारांचा रोज इतिहासातील एक एक घटना पुसत चाललो आहोत.
अहो अशाने राजेच काय परंतु एक मावळाही जन्मास येणार नाही ..
नुसते पुतळे चौकाचौकात उभे करुण ट्रँफिक जाम करण्यापेक्षा
आपल्या अंतरंगात व आचरणात राजांचे  विचार आत्मसात करा.
तरच त्या अनाम गडवीरांना आणि गड किल्यांना भेट दिल्याचा फायदा होईल.