||श्री शिवरायाय नमः ||
अफझल वधा नंतर महाराज निघाले विजापूरच्या रोखणे पुढे त्यांनी पन्हाळा घेतला.विजापूरकर सततच्या पराभवाने चिडले होते.
मग पापी औरंग्याच्या मदतीने महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी एकी कडून
शाहिस्तेखान आणि दुसरीकडून सिद्धी जोहर महाराष्ट्रावर चालून आले.
मोंगल आणि विजापूरकर यांना एकाच वेळी आवरणे कठीण.
सिद्धी आणि शाहिस्तेखान दोघ एकत्र येण्या पूर्वी काहीतरी कारण आवश्यक होत.
आणि म्हणून ईकडे सिद्धीशी तहाची बोलणी अत्यंत मधाळ भाषेत सुरु झाली..
पूर्ण शरणागतीच पत्र हि गेल,,,
नेमका सिद्धी यालाच भुलला आणि त्याच्या कडे महाराजांच्या वकिलांच येन जन चालू झाल .
आणि मग गड पायाखाली घातला जावू लागला,,,
डोळ्यांनी शोधला जावू लागला ,,
शिवरायांचे हेर सिद्धीच्या पहार्यावर लक्ष ठेवू लागले,,
एकंदरच वाटा घाटी मुळे पहारा ढिला पडू लागला,,,,,,
आणि याच बेसावध पणाचा नेमका फायदा महाराजांनी घेतला,,,,,
१२ जुलै रात्रीचा पहिला प्रहर किर्र काळोख
महाराज बाजी प्रभू आणि निवडक मावळ्यांसह निघाले राज दिंडीने
टेहळे अंधाराचा वेध घेत होते,,,,,,,,,
पुढेमागे धारकरी ठेवून माराजांची पालखी चालली होती.
आणि अगदी तशीच आणखी पालखी निघाली त्यात महाराजांचं वेश धारण करून
"शिवा काशीद" बसला होता .
आषाढाचे दिवस घनदाट जंगल आणि पावसाळी वातावरण त्यात काळोख,,,,,,
मसाई पाठराजवळ दोन्ही पालख्या वेगळ्या झाल्या
शिवा काशीद ५० मावळ्यांसह मलकापूरच्या रोखणे निघाला,,,,,
आणि महाराज मसाई पठार चढले ,,
वादाल्वार्याची तमा न बाळगता पालखीचे भोई महाराजांची
पालखी पळवत होते,,,,,
आणि ईकडे शिवा काशीद चालला होता बायकोच कुंकू पुसून
मरणाला मिठी मारायला ,,,,,
ठरल्या प्रमाणे शिवा काशिदची पालखी सिद्धीच्या पहारेकर्यांनी पहिली.
त्याला पकडण्यासाठी सिद्धीच सैन्य धावल लुटूपुटुची लढाई झाली
अर्थातच तोतया शिवाजी पकडला गेला,,,,,,
विजयाच्या उन्मादात सारे सारे गनीम त्याला पकडून
सिद्धीकडे गेले कुणीच आज पर्यंत महाराजांना पाहिलं नसल्या मुळे
सारे गाफील राहिले लगेच दिवाळी साजरी करण्याचा हुकुम देण्यात आला,,,
तोपर्यंत महाराजांना ओळखणारे बाजी घोरपडे आणि फाजलखान आले
मशालीच्या उजेडात त्यांना बाहेर येण्यास सांगण्यात आल,
आणि झाला प्रकार लक्षात आला........
बाजी घोरपडे आणि फाझलखान म्हणाले हा शिवाजी नाही,,,,,,
शिवा काशीद ने हि मग तशी कबुली दिली,,,,
आणि शिवा कशीद च मस्तक धडा वेगळ करण्यात आल,,,,,,
आपल्याला फसवण्यात आल खरा शिवाजी दुसय्रा मागणे पाळला हे त्यांच्या
लक्षात आल.....
मग पुन्हा फसवणूक होवू नये म्हणून आणि पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी
स्वतः फाझलखान आणि सिद्धी मसूद निघाला,,,,
बरोबर कर्नाटकी पायदळ पीड नाईक सोबत निघाले .
ईकडे महाराज मसाई आईला साकडे घालून कुंभारवाडी चापेवाडी,
खोतवाडी,करपेवाडी,आंबेवाडी,मालेवाडी, पाटेवाडी,,,,
मागे टाकत महाराज म्हसवड जवळ पांढर पाण्याजवळ आले.
आणि येथेच घात झाला,,,,,,
टेहळ्यांनी धावत येवून बाजी प्रभूस बातमी दली मलकापूर जवळून
घोड्यांच्या टापांचा आवाज येत आहे.
गनीम मागावर आला होता,,,,,,आता लगेचच हालचाल करावी लागणार होती,
बाजींनी निवडक धारकरी बाजूला काढले
सिद्धीच प्रचंड सैन्य रोखण हे आता त्याचं काम होत,,,,,
१३ जुलै पहाटेचा पहिला प्रहर,,,,,
सतंत धार लागून राहिली होती मधून मधून विजा कडाडत होत्या ...
सिद्धी समाजाला महाराज येथेच जवळपास कुठे तरी आहेत,,
समोर अनुस्कुरा आणि विशाळग सारासार विचार करून सिद्धी विशाल
गडा कडे वळला ,,,,,
घोड खिंडीत मग बाजींनी निर्णय घेतला,३०० मावळ्यांचा गट करून
बाकीचे मावळे पालखी सोबत ठेवले ,,,महाराज तुम्ही विशाल गडी निघा .
मी येथे गनिमाला थोपवतो,,,,,असे बाजी महाराजांना म्हणाले.
महाराज म्हणाले आम्ही गडावर पोचताच तोफांच्या ईशारति करू,
सिद्धी मसूद आणि फाझलखानच घोडदल खिंड उतरू लागल,,,,,,,,,
वरून फेसाळत येणारा ओढा जसा अंगावर कोसळतो तसेच हे सारे
धारकरी सिद्धीच्या सैन्यावर कोसळून पडू लागले,,,
हर हर महादेवची गर्जना करत मराठे वीर सिद्धीच्या सैन्याला भारी पडत होते .
कुठून होतो तेच सिद्धीच्या फौजेला कळत नव्हत,,,,
गोफणीतून दगड असे पडत कि तलवार उचलायला हात उठत नसे ,
घोडखिंड विजापुरी सैन्याच्या किंकाळ्यांनी भरून गेली .
तर कधी गडगडणार्या शिळा घोड्यांवर आदळत होत्या ...
त्या अरुंद जागेत घोडे आवरणे कठीण जात होते.
आणि मराठी सैन्याचा मागमूस लागत नव्हता,,,
पण हळू हळू विजापुरी सैन्य सावरल आणि मराठी मावळा
त्या घोडखिंडीत लढत होता पडत होता पण हटत नव्हता,,,,,,
कारण या मराठी सैन्याच्या मधोमध साक्षात शिवशंकर
बाजींच्या रुपात हातात पट्टे घेवून तांडव करत होता
हळूं हळू मराठी फौजेची पीछेहाट होत होती
खूपशे कमी आले होते एक एक मावळा १०/१० जणांचे वार झेलत होता,
सारी खिंड रक्ताने न्हावून निघाली होती,,,,,
बाजी आवरला जात नाही पाहून कर्नाटकी पीड नाईक झुडूप आड झाला तिथून
बंदुकीची गोळी झाडण्यात आली,,गोळी बाजींच्या दंडास लागली,,,
पट्याचा एक हात थांबला,,,,,,,
विजापुरी सैन्याने बाजींची कोंडी केली,
तलवारीचे घाव बाजींवर पडले बाजी खाली पडले पण प्राण जात नव्हता,,,,
जीव घुटमळत होता, मराठ्यांचा प्रतिकार क्षीण झाला ,,,,आणि,,,,,,,,,
तितक्यात तोफांचा आवाज झाला,,,,,,,,,आणि बाजींनी देह ठेवला.
विजापुरी सैन्य विशाल गडाकडे निघाले
खिंडीत प्रेतांचा खच पडला होता,,,,,,
सैन्य विशाल गडाकडे गेल्यावर मराठी सैन्यांनी बाजींचा देह उचलला ,
महाराजांना बाजी पडल्याची बातमी कळली
महाराज म्हणाले आज घोडखिंड पावनखिंड झाली