Friday 3 August 2012

शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड 2012

ऐतिहासिक पदभ्रमण मोहिम २०१२"
रविवार दिनांक १ जुलै ते बुधवार दिनांक ४ जुलै २०१२ 
शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड मोहीम राबवली गेली त्या मोहिमेत 
मी केलेल्या भाषणाचा भाग अवश्य वाचा 
धर्मशास्त्र सांगत ३ गोष्टी नित्य नूतन
१-रामायण महाभारताची कथा
२-सूर्योदय सूर्यास्त
३-आणि स्वपत्नी,,,
पण मला या आणखी ४ थ जोडवास वाटतय
शिवचरित्राची गायन ,,,,,

आज ईथे मी बोलायला बसलो आहे याचा अर्थ मी काही ईतिहास तद्न्य नाही ,
संशोधक तर नाहीच नाही ,
पण या वाटेवरची ती गरज होती कारण हि शिवशौर्याची परंपरा आपल्याला कळली पाहिजे .

त्या शिवाय हे जे काही स्वातंत्र्य आज उपोभोगतो आहे ते कशाच्या जोरावर मिळवलं ते कळणार नाही,,,,
असो या वाटेवरचा ईतिहास सांगण्याआधी
एक छोटी गोष्ट सांगावीशी वाटते,,

या पृथ्वीची चराचराची रचना केल्यावर सार्यांना आपापली कामे सोपवल्यावर
ब्रम्हदेव निवांत झाले,

ईकडे या पंच महाभूताचे चक्र सुरु झाले.
संध्याकाळ होत आली तसा सूर्य हि हळूहळू शांत होवू लागला आणि अचानक
तो चिंताग्रस्त झाला अरे आता थोड्याच वेळात माझा अस्त होणार मग या
सार्या चराचराला प्रकाश कोण पुरवणार ?
सारे चंद्र चांदण्या तारे तारका विचारात पडले कि आता काय करायचे?
या सार्यांना आपली कुवत ठावूक होती आपण सारे मिळूनसुद्धा
सूर्याच्या प्रकाशाचा मुकाबला करू शकत नाही,मग,,,?
कुणाचाच डोक चालेना काय करायचं?
ईतक्यात एक लहान पणती धावत आली आणि म्हणाली,
प्रकाश दादा मला माहित आहे मी तुझ्या उजेडाचा मुकाबला नाही करू शकत
पण,,,
मी माझ्या परीने तुझ प्रकाश पोहचवायचं काम मी नक्की करेन
तू निश्चिंत मनाने जा,

नेमकी गोष्ट ईथेच आहे माझ्या मित्रांनो,
त्या पणती सारखा आपण प्रत्येकाने आपापल्या पुरत्या
जर पणत्या लावल्या तर क्षणार्धात आपण दिवाळी साजरी करू शकू आणि,,,,
आणि सगळ्यांनी मिळून पेटवायचच ठरवलं तर क्षणार्धात
समोरच्याची राखरांगोळी करू मग समोर भले पाकिस्तान असो नाही तर चीन,,,
आणि मी तुमच्या समोर आलोय त्या पणतीच काम करायला
कारण जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण
असो ,,
नमनालाच घडाभर तेल जास्त ओतल तर पुढे अजून आग लावायची आहे
कदाचित पुरणार नाही,,,
--------------------------------------
तर सांगायचं अस ,
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आई आणि गुरु दादोजींनी असा काही तयार केल
होत आणि स्वतः छत्रपतींनी त्यांच्या मावळ्यांना ,,,
त्या सार्यांच्या मनात त्यांनी ठासून भरवल होत,
हिंदवी स्वराज्य आणायचं असेल तर ,
या महाराष्ट्र भवानीला आता पाण्याचे -दह्यादुधाचे अभिषेक खूप झाले ,
तिला प्रसन्न करावयाचे असेल ,
हिंदुस्थानला यवनांच्या दास्यातून सोडवायचे असेल तर आता,
ईथल्या देवदेवतांना रक्ताचा अभिषेक घालावा लागेल ,,

आणि यासाठी आपल्या मावळ्यांना घेवून महाराज प्रथम रोहीडेश्वरावर गेले,
आणि आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या त्या रोहिडेश्वराला घातला पण
त्या रोहिडेश्वराला हि त्यांनी बजावला बाबारे हा माझा आणि माझ्या मावळ्यांच्या रक्ताचा
पहिला आणि शेवटचा अभिषेक बर का,
आता आम्हाला ईतकी ताकद दे कि यापुढे तुला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक घालू शकू ,,
आणि आई भवानीने तीच वचन पाळल,
महाराजांना ३२ दातांच्या बोकडाचा नैवेद्य द्यायचं बळ तिने पुरवल,,,
महाराजांनी अफझल खानचा वध केला,
खानाचा कोथळा बाहेर काढला,,,

हो,पण ती महाराष्ट्र भवानी होती.
ती अशी एका बोकडाने प्रसन्न होणारी नव्हती ,
तिला आता चटक लागली होती यवनांच्या रक्ताची ,,
आणि महाराज निघाले अफझल खानच्या फौजेचा सुद्धा दारून पराभव झाला होता,
आता स्वस्थ बसन शक्य नव्हत,

ईकडे महाराजांनी आदिलशहाचा कोल्हापुर पर्यंतचा मुलुख घेतला होता.
महाराजांची हि गरुड झेप त्याच्या डोळ्यात सलत होती,
आणि आता तर राजे कोल्हापूर नंतर विजापुरी धडक मारणार होते,
आणि ईथेच आदिलशाहने पुन्हा एकदा औरंगजेबाला आवाज दिला "ईस्लाम खतरेमे"

अर्थात औरंग्याला हि भारी पडलेल्या अफ्झुल्याला मारणारा शिवाजी त्यालाही नकोच होता ,
मोंगलाई आणि आदिलशाही यांच्या मध्ये एक हिंदू राष्ट्र उदयाला येतय हे त्याला हि पाहवत नव्हत,
महाराजांचा राज्य विस्तार हा कुणा जहागीर्दाराचे बंड अथवा उठाव नव्हता,हे तो जाणून होता,
आणि त्याच वेळी आदिलशहाच्या दरबारात
ईस्लामचा पक्का बंदा शागीर्द सिद्दी ,सिद्दी जोहर हजर झाला ,,,

जोहर म्हणजे रत्न बर का हा त्याचा बहुमान होता ,
सार्या मुसलमानात शोभून दिसावा असा,असा तो खुनशी हबशी
बारा हत्तींची ताकद लाभलेला आपल मनगट म्हणजे त्याचा एक एक ओठ होता
म्हणजे तो किती धिप्पाड आणि ताकदवान होता विचार करा,
हत्ती सुद्धा त्याला धडक मारताना विचार करत असे,,
असा हा सिद्दी आदिलशहाला  म्हणतो ,
"मला त्या हरामखोर पाजी शिवाजीला पकडायची परवानगी द्यावी ,,"
आणि योग्य माणूस आणि संधी याची वाट पाहत असलेला आदिलशहा मनोमन खुश झाला ,
त्याने लगोलग सिद्दी जोराहारला "सलाबतखान"खिताब देवून गौरवल आणि,
सोबत ३०\३५ हजार फौज हि दिली,आणि सोबतीला पित्याच्या वधाचा
बदला घेण्यासाठी वाट पाहणारा फाजलखान हि सोबत दिला त्याच्या नसा नसात
महाराजांच्या विरुध्द द्वेष भरला होता,,,
--------------------------
सिद्दी निघाला,
त्यावेळी महाराजांच्या सैन्याने मिरजेच्या किल्ल्याला वेढा दिला होता.
आणि औरंगजेब त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसला होता ,
महाराज कोल्हापुरात गुंतल्याचे पाहून त्याने आपल्या मामाला शाहीस्त्येखानला
आदिलशहाच्या मदती साठी ,ईस्लामाच्या गौरवासाठी ,ईस्लामचा झेंडा फडकवण्यासाठी,पाठवले
तिकडून सिद्दी आणि मागून शास्ताखान या दुहेरी पेचात त्याने बरोबर पकडल,,
पण ईथे नेमका योगायोग लक्षात घ्या ,
अशीच परिस्थिती शहाजी राजांची झाली होती,
पापी औरंग्याचा बाप शहाजहान आणि आदिलशहा एक झाले होते,
दोघांनी मिळून शहाजी राजांचा पाडाव करून त्यांना कायमचे दक्षिणेत धाडले,,
आणि हि किमया साध्य झाली केवळ एका हाळीवर वर "ईस्लाम खतरेमे"
आणि ईथेच महाराजंचे द्रष्टेपण लक्षात येते ,
"आपण ईतिहासात डोकावतो ते एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी,
आणि महाराज डोकावत ते झालेल्या चुका सुधारण्यासाठी "
आता महाराजंवर मोठी जबादारी होती ,
या दोघांना पुहा एक होवू द्यायचे नव्हते,
ईथे आणखी एक सांगावास वाटत हि महाराजांची युद्धनीती होती ते स्वतःच्या
भूमीत युध्द खेळ नसत ,,,
नेमक हे आज चीन पाकिस्तान करताना दिसत आहे
आणि त्या दृष्टीने त्यांना पन्हाळा हा दक्षिण सीमेवरचा किल्ला
मुक्कामाला अत्यंत चांगला होता,
शिवाय विस्ताराने खूप मोठ्ठा रस्तेही भरपूर,आणि आपल्या मुलखाची हानी नाही,
आणि शास्ताखान पुण्याच्या पलीकडे लगेच येणार नव्हता
बर मागे फिरालोच तर पुन्हा शास्ताखान आणि सिद्दीजोहर एक होण्याची शक्यता ,
हा सारासार विचार करून महाराजांनी पन्हाळा निवडला,,
शिवाय पन्हाळ्यावर अन्नधान्य भरपूर किमान ३\४ महिने पुरेल ईतके,,
बर पुन्हा २\३ महिन्यात पाऊस हि सुरु होणार होता
मग सिद्दीचा वेढा हि सैल होणार होता,
आणि तिकडे मिरजेत नेताजी पालकर तयार होतेच महाराजांच्या मदतीला,,
हि सुद्धा जमेची बाजू होतीच,,,
हो पण हा वेढा सिद्दी जोहरचा होता, त्याने तो असा काही आवळला होता कि
परिंदा भी पर न मार सके,मुंगीहि शिरताना दहादा विचार करेल,परंतु
"सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहिजे"
भगवंत म्हणजे सत्य सत्याचे अधिष्टान आणि ईथे तर साक्षात महाराज म्हणजे
शिवशंकराचा अवतार हेच सत्य होते ,,
यश हे मिळणारच होत नियतीशी तसा करारच  झाला होता,,,
--------------
पण शत्रू हि तितकाच बेरकी आणि मात्तबर होता ,
या सार्या परिस्थितीची जाणीव त्याला हि होती,
या साठी टोपीकरांच्या लांब पल्याच्या तोफा हि त्याने मागवल्या होत्या
आणि शत्रूचा शत्रू तो आपल्या मित्र या न्यायला जागून हरामखोर ईंग्रज
ईमाने ईतबारे जोहारला सामील झाले होते,
येताच गडावर तोफांचा मारा चालु केला,त्यांना माहित होत हे सार पावसाळ्याच्या आत
उरकल पाहिजे,त्यासाठी महाराजांना मदत करणार्या आजूबाजूच्या लोकांना
धमक्या देवून ताब्यात घेण्यात आल,खबरदार जर महाराजांना मदत कराल अशी तंबी
देण्यात आली,दिवस जात होते तस तसा सिद्दीचा वेढा
सैल होण्या पेक्षा जास्त आवळला जात होता,
आता मात्र महाराज चिंतेत पडले त्यांनी ठरवलं आता जास्त दिवस
पन्हाळ्यावर राहता काम नये,,
काही तरी युक्ती लढवून पन्हाळ्याहून सुटका करवून घेतली पाहिजे,,,
तिकडे शास्ताखान पुण्याला हळूहळू नख लावू पाहत होताच
नेताजींची ताकद बाहेरून मदतीला कमी पडत होती,
आणि सिद्दीशी समोरासमोर लढायची ताकद आपल्यात नाही याची हि जाणीव होती,,
त्यातही स्वराज्याची चिंता अधिक,,
अजून किती दिवस अडकवून घेणार निसटायला तर हवेच हवे,
आणि विचार ठरला पन्हाळ्यावरून निसटायचा ,
आणि महाराजांनी पहिला घाव घातला ,
सिद्दीला भूलभुलैया पत्र पाठवलं ,
जोहर साहेब मला तुमची खूप भीती वाटते ,खरतर तुम्ही ईथे आलात तेव्हाच मला तुम्हाला भेटायचं होत.
पण तुमच्या पुढे आपली काय किंमत म्हणून टाळल,
पण आता आम्ही जातीनिशी तुम्हास भेटावयास तयार आहोत
तेव्हा आमच्या हातून चुकून झालेले गुन्हे आपण माफ करावे
भेटी अंती सविस्तर बोलूच वैगेरे वैगेरे,,,"
अशी गोड गोड मध चाटवलेली पत्र मग रोजच जावू लागली
हळू हळू महाराजांचे दूत आता जोहर कडे ये जा करू लागले.
आणि सिद्दीला घाबरून
महाराज कसे शेपूट घालून बसले आहेत याचं चमचमीत बातम्या पसरवू लागले.
आणि दुसरी कडे आदिलशहाला महाराज आणि सिद्दी एक होत आहेत
रोज दारूच्या मटणाच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत अशा बातम्या जावू लागल्या ,
लवकरच दोघ हि हातमिळवणी करणार आहेत,आणि आदिलशाही ताब्यात घेणार आहेत,
जोहारला त्यासाठी महाराजांनी लाच दिली आहे,
असे सारे डावपेच आखत खेळत महाराजांनी जोहर भेटीचा एक दिवस ठरवला ,,
-------------------------
१३ जुलै हिंदूंचा राजा शिवाजी आता शरण येणार असच एकंदर वातावरण सिद्दीच्या गोटात होत,
ईकडे जोहारही उद्या शिवाजी ताब्यात येणार म्हणत मनाचे मांडे खात होता ,
आणि या सार्याचा अपेक्षित परिणाम जाणवू लागला होता,,
वेढा हळूहळू सैल झाल्याचा जाणवत होत ,,
परंतु पन्हाळ्याहून निसटायचे म्हणजे नक्की कुठे जायचे?
आणि मग विशाळगडी जायचे असे ठरले,,
विशाळगडीच का? तर
आसपास घनदाट जंगल डोंगराळभाग,आणि यावर सिद्दीची मात्रा चालणार नाही,
आणि आपण छोट्या छोट्या वाटांनी  आपण सहज कोकणात उतरू शकतो,
पन्हाळ्यावर तयारी सुरु झाली सर्वात पुढे होते बाजीप्रभू
सिद्दीच्या तोडीचे तेव्हडेच उंच आणि तगडे,
उभे राहिले तर शनिवारवाड्याचा बुरुज उभा आहे कि काय असे जाणवे,
पण सिद्दीच्या भेटीला जायचे म्हणजे नक्की काय करायचे ?
आणि मग निस्टायचे  कसे?
आणि भेटलो तर सिद्दी त्याच्या तावडीतून सोडेल?
अनेक प्रश्न भुंगा घालू लागले,,
मग ठरले तोतया शिवाजी पाठवायचा आणि महाराजांनी दुसऱ्या वाटेने चकमा देवून निसटायचे,
पण शिवाजी कुणाला बनवायचे हा प्रश्न होताच सारेच चिंतेत पडले,,(संदर्भ पणतीच्या गोष्टीचा)
आणि या सार्या मावळ्यांच्या मध्ये शिवा न्हावी बसला होता,
शिवाजी कोण बोलल्या बरोबर त्याने तटकन उडी मारली
"महाराज मी होतो शिवाजी"
शिवा न्हावी महाराजांची दाढी करणार एक सामान्य माणूस,,
बघा महाराज तुमच्या सारखीच दाढी-केस देखील आहे,
आज संधी मिळाली आहे राज ध्या ती कापड मी जातो सिद्दीला सामोरा,
एकंदरच त्याचा तो आवेश पाहून राजे म्हणाले,
"तू जाशील रे शिवा पण विचार केलास का कि तुला
कुणाला सामोर जायचे आहे ?सिद्दीला,,,,,,
त्याच्या ताब्यात गेल्यावर काय होईल माहित आहे?
एक गुढ शांतता पसरली मुसलमान आणि तोही सिद्दी त्याचा ताब्यात गेल्यावर
काय होत ते सारे जाणून होते,
पण त्याच आवेशात शिवा म्हणाला ,
"माहित आहे मला तो मारणार हाल हाल करून मारेल,"
पण एक सांगू राज?
असाच आयुष्यभर जगलो तर लोक म्हणतील शिवान्हावी मेला
पण सिद्दीचा हातून मेलो तर लोक म्हणतील शिवाजी म्हणून मेला ",,
ईकडे महाराजांच्या कपड्याचा जोड तयारच होता,
महाराजांनी सांगितलं जा शिवा कपडे घालून ये
दोन मिनिटात शिवा हजर कपडे घालून,,,
काय पण मरणाची घाई ,,,?
महाराजांनी आपली कवड्याची माळ त्याच्या गळ्यात घातली,
आणि आता मात्र महाराजांना अश्रू आवरेनात,
ते शिवाला म्हणाले शिवा तू मरणार व्हयर माझ्या साठी?
शिवा लगेच सावध झाला ,
"महाराज आता मन बदलू नका माझ्यावर जबादारी टाकली आहात ना ?
मी मरेन पण तुमच्या नावाला बट्टा नाय लावू देणार महाराज आता मन नका बदलू  ,,
अहो मेल्या माणसासाठी रडणारे खूप पहिले पण जित्या माणसासाठी रडणारा
राजा आम्हाला भेटला राजे तुमच्या एकेका अश्रूतून एकेक शिवाजी महाराज तयार होईल
तुमी काळजी नका करू,,
आज संधी ती मला मिळतेय महाराज आता मन नका बदलू
आणा तो जिरेटोप ईकडे,,आणि ईतक्यात त्रिंबकपंत आल्याची वर्दी आली
तसे महारज लपले शिवला म्हणाले तू गप्प उभा रहा काही बोलू नकोस,,,
त्रिंबक पंत आले महाराजांना मुजरा केला ,मुजरा महाराज
शिवा काहीच बोलला नाही तसाच पाठमोरा मख्ख उभा
त्यांनी परत मुजरा केला मुजरा महाराज,,
शिवा तरीही गप्प पण गप्प कसा बसणार
आणि शिवाने तोंड उघडल मात्र त्रिंबक पण रागावले ,शिवा काही अक्कल ?
म्हणत हात उगारला लगेच महाराज बाहेर आले
थांबा त्रिंबक पंत अहो रोज माझ्या बाजूला उभे राहणारे तुम्ही फसलात
तो जोहर काय चीज आहे ठरलं
आपला शिवाजी म्हणून उद्या शिवा च जाईल,,,
पटापट पटापट शिवाला सूचना देण्यात आल्या कस वागायचं ?
कस चालायचं कस बसायचं,,,
कस बोलायचे ते त्रिंबक पंत बघतील,,
ठरलं निवडक १२०० मावळे घेवून निसटायचे
आणि थोडे शिवाच्या पालखी बरोबर पाठवायचे बाकीच्यांनी ईथे
राहून किल्ला लढवायचा
------------------------------
१२ जुलै रात्री १० चा सुमार,
रस्त्याची खडानखडा माहिती असणारे माहितगार मंडळी
आणि स्वतः बाजी प्रभू आणि शिवा काशीद
कानोकान खबर लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती,
सिद्दी मागे लागलाच तर या दाट जंगलात त्याला पाठलाग करता येवू नये,
किर्र रात्र फुटाफुटावरच काहीही दिसू नये याची हि काळजी ,
ते जंगल घेत होत,
ईकडे जोहरच्या छावणीतहि आनंद पसरला होता.
पाण्या पावसाच निमित्त होवून वेढा ढिला पडत होता,
पावसाच्या रिपरिपी पुढे मशाली टिकत नव्हत्या,

ईकडे शिवा तयारच होता हिंदवी स्वराज्यासाठी ,,
आज आपण म्हणतो आई जिजाई आणि गुरु दादोजी यांच्या मुळे
महाराज घडले हो घडलेच परंतु, लक्षात ठेवा
माता भवानी या मावळ्यांच्या रूपात सतत महाराजां सोबत होती
त्यांच्या वरून जीव ओवाळून टाकायला ,,

मित्रांनो आज हा रस्ता पार करायला २\३ दिवस लागत आहे,
सकाळी चालायला सुरवात केली तर वाटत कधी संध्याकाळ होणार कधी मुक्कामी पोहचणार?
कधी करपेवाडी येणार?कधी खोतवाडी येणार?
आणि खांद्यावर काय तर आपलीच ब्याग,,,
आणि ईथे तर महाराजांची पालखी न्यायाची होती,
समोरचा रस्ता माहित नाही,झाडी झुडप कापत तो तयार करायचा ,
पुढे चालायचं पाय टाकू ती जमीन असेल कि निसरडा रस्ता माहित नाही,
त्यातही रात्री सर्पटणारे प्राणी आणि सोबतीला मिट्ट अंधार,,,

गडावरून निसटण्या आधीच महाराजांनी आपल्या सरदारां मार्फत
रसद तयार ठेवाली होती,
जस जसे ते पुढे सरकणार होते तस तसे त्यांचे सैन्य वाढणार होते,
पाठलाग होणार हे तर निश्चित,
त्यासाठी शत्रूला मागेच भांडता ठेवण भाग होत,
बर हि सारी खबरदारी शत्रूला समजू न देण हे आलच,
नाही तर सारा डाव फिसकटणार हे ठरलेलं,बर पुढे विशाळगडला हि
वेढा होताच तो फोडायचा तर हाताशी सैन्य हे हवेच तसा तो वेढा कितीही सैल असला
तरीही पन्हाळ्यावरून धावत पळत येवून अशी कितीशी ताकद लढायची राहणार होती?
पण आई भवानी पाठीशी होती ,
____________________
महाराजांनी जंगलातील अवघड वाट निवडली होती.
महाराज निघाले वार्या पावसात मशाली टिकत नव्हत्या.
हळू हळू जोहरचे सैन्य मागे पडत होते.
पुढे मसाई पाठराजवळ निवडक सैन्य वाट पाहत होत.
तिथूनच पुढील हालचाली होणार होत्या.दोन पालख्या तयार ठेवल्या होत्या.
ईथूनच महाराज आणि शिवा वेगवेगळे होणार होते,

शिवा आता तुझ्यावरच पुढची सारी मदार
शिवा नीट जा जपून जा.
जमेल तितक जमेल तस सिद्दीच्या फौजेला झुलवत ठेव,
जा आई भवानी तुझ्या पाठीशी आहे,
शिवा पालखीत बसला भोयानी पालखी उचलली
कोण कुठला शिवाजी स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो काय,
आम्ही भुलतो काय,
यातून साध्य काय होणार,आमचा फायदा काय,
उलट राजा म्हणून शिवाजी मिरवणार आम्हाला काय असला विचार हि नव्हता ,
असो,
शिवा काशिद्ची पालखी निघाली
तिकडे महाराजही निघाले,

पाऊस,चिखल,निसरडा रस्ता यामुळे वेग येत नव्हता,वाटाडे वाटा शोधात रस्ता बनवत होते,
एक जरी मावळा मागे पडला तर काळ त्याला क्षमा करणार नव्हता ,,
पुढे पठार संपत आले, हळू हळू खोतवाडी,आंबेवाडी,कळकवाडी,रिंगे
वाडी,मालेवाडी,पाटेवाडी,
पार करत महारज म्हसवडला आले,,,
काय पटापट गाव मागे गेली ना?
खरच ईतक सार सोप्प होत?

हा सारा डोंगराळ दाट जंगलचा भाग ,डोंगरच्या डोंगर पार करायचे,
खिंडी पार करायच्या ,आणि पाऊस?? पाऊस म्हणजे महापूर,,,
शेवाळे दगड,गोटे,चीखलाच्या वाटा या सगळ्यांची
खडानखडा माहिती असल्या शिवाय दिवसा उजेडी जाण शक्य नव्हत
तिथे महाराज रात्री निघाले होते,,,

गावकुसातून जाताना गावातली कुत्री भुंकून भुंकून त्यांचा निरोप
सिद्दी पर्यंत कसा जाईल याची काळजी घेत होते,,
ईकडे सिद्दीचे सैनिक नाही म्हंटल तरी पहारा देतच होते,
थोडा सैलपणा आला होता ईतकच पण पहारा चालूच होता,
जवळपास नाही पण लांब लांब सैनिक रात्री फिरतच होते,
आणि घात झाला ,

रात्रीच्या अंधरात कुणाचे चेहरे दिसत नव्हते पण त्यांच्या
लक्षात आला काही तरी गडबड आहे कुणी तरी पालखीत बसून
वेढ्यातून निसटू पहाताय,,
आणि छावणीत एकच गोंधळ उडाला भागा भागा गनीम भागा
काफिर पकडो मारो सालेको
पकडो मारो काटो धाढ धाड सारे शस्त्र सज्ज झाले.
नगारे ढोल वाजू लागले
सारे हबशी जमा झाले हातात भाले बारच्या बंदुका घेतल्या
आणि लक्षात आल
अरे पालखीतून जात आहेत म्हणजे ते शिवाजी महाराज असतील,
मग मात्र आणखी गोंधळ उडाला सारेच पालखीवर तुटून पडले,
ईकडे सिद्दी उद्याची स्वप्न पाहत झोपायच्या तयारीत होता,
छावणीतील गोंधळाने त्याचीही हि झोप उडाली,
सार्यांनी पालखीला वेढा घातला ठरल्या प्रमाणे खोटा खोटा प्रतिकार झाला ,
पालखी ताब्यात घेतली आता पाहिलं तर शिवाजी ,,,,

शिवाजी गिरफ्तार झाला याचा उन्माद ईतका कि कुणाला
वाटलाच नाही हा शिवाजी असेल कि नाही याची खातरजमा हि करावीशी वाटली नाही,
सनई चौघडे वाजवण्यात आले,फटाके फोडण्यात आले,
साला शिवाजी पाळतो तो हि आमच्या वेढ्यातून,,,?
अशी एक प्रकारची नशा होती,
प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
जो तो येवून शिवाजीला बघून जात होता
सारे एकमेकांना गचलत होते काफिराचा राजा दिसतो तरी कसा हे पाहण्यासाठी
सिद्दीच्या छावणी बाहेर गर्दी झाली होती
शिवला तसाच बांधून सिद्दी समोर उभा करण्यात आला
आता सिद्दी आनंदाने बेहोश झाला होता
सिद्दी गरजला हरामखोर भागाने कि कोशिश करता है?
शिवाने तोडक मोडक उत्तर दिल,,
तसा सिद्दी परत गरजला बैठो नीचे बैठो,
आणि खरच शिवाजी पकडला का बघयला फाझलखान आला
त्याला बापच्या वधाचा बदला घ्यायचा होता,

मशालीच्या उजेडात त्याने शिवाजीला निरखून पाहिलं ,,,
आणि ओरडला अरे ये सिवा नही,,,
अफझल वधाच्या वेळी शिवाजी महाराजांना जवळून पहिल होत त्याने
त्यामुळे त्याने लगेच ओळखल कि हे ते शिवाजी महाराज नाहीत,,

आता मात्र छावणीत खर्या अर्थाने गोंधळ उडाला,
सिद्दीने कमरेची तलवार उपसून त्याने शिवाला टोचून विचारलं
हरामखोर कौन हो तुम?
आम्हाला फसवतो?
तुम्हे मरणे का डर नही?
डर ? कसला डर आणि तो हि मरायचा?
अरे पालखीत हि कापड घालून बसलो तेव्हाच मेलो तू काय आता मारणार ? 
शिवा म्हणाला ,
"आर मरणाची भीती कुणाला?
आमच्या महाराजांना निसटायला जितका वेळ मला देता आला
त्यामुळे धन्य झालो माझ्या आयुष्याच सोन झाल,
आता तू मारलास काय तर काय फरक पडतो,?
अरे हव कशाला ते फालतू पांचट आयुष्य ?

पण सिद्दीचा पारा चढला होता त्याला हि वटवट ऐकायला वेळ कुठे होता?
त्याने खाचकन त्याची तलवार पोटात घुसवून पाठीतून बाहेर काढली,,,
आता त्याला वेळ नव्हता त्याला महाराजांचा पाठलाग करायचा होता.

शिवाला तसाच टाकून तो बाहेर आला सैन्यला तयारीला लावलं
कोणी कुठे कस जायचं,किती जणांनी जायचं,याच्या सूचना देण्यात आल्या ,,
महाराजांना कुठे गाठू शकतो याचा अंदाज घेण्यात आला ,

ईकडे शिवा कळवळत होता ,
त्रिंबक पंतानी त्याला सावरून धरल,,
शिवा कळवळत होता सिद्दीचा वार होता तो,
पण त्याही अवस्थेत शिवा म्हणाला पंत जातों आता ,
आमची येळ झाली
पण तुम्ही महाराजांना
भेटलात तर माझा निरोप द्या म्हणाव शिवान दुष्मनाला पाठ नाय दावली
वार छातीवर घेतला शिवा पळताना नाय मेला,
मृत्यू समोर हे असा छातीचा कोट करून उभा होता
तुमाला सोबल असाच मेला शिवा शिवाजी म्हणून मेला
पंत सांगाल ना? अस म्हणत म्हणत धडधडणारी छाती शांत झाली,,,
_____________________-
सिद्दीच सैन्य वायुवेगाने महाराजांच्या मागे लागल
पांढरपाण्या जवळ अडवू हे त्यांना पक्क माहित होत त्या प्रमाणे
त्यांची दौड सुरु होती,,त्यांचा अंदाज पक्का होता
महाराजांच्या सैन्याला आता हळू हळू सिद्दी मसूदच्या घोडदळाचा आवज ऐकू येवू लागला,
आणि बाजींनी शिवप्रभूंना सांगितलं महाराज आता तुम्ही व्हा पुढ
गनीम जवळ येतोय त्याला मी रोखून धरतो तुम्ही पुढ जा,,
मी हि घोड खिंड लढवतो,,

बाजी प्रभू,,,
येताना आपण पहिलय त्यांचा पुतळा तिथे उभे राहून मारे आपण आपले फोटू
काढून घेतले त्यांच्या शेजारी उभे राहूनही आपल्याला आपल खुजेपण नाही
ओळखता आले तो जो पुतळा आहे तो त्यांच्या वरील प्रेमामुळे असा मोठा बनवला नाही
बाजी होतेच तसे धिप्पाड जणू काही शनवार वाड्याचा बुरुज,,
धा धा वीस वीस तास व्यायाम करून ते शरीर कमावल होत,,
दोन हातात दोन तलवारी घेवून ते लढायला उभे राहिले कि काळ हि थरारत असे,

अशा बाजींनी महाराजांना सांगितलं तुम्ही व्हा पुढ विशाळगडा कडे
मी बघतो
यावर राजे म्हणाले बाजी मी तुम्हाला सोडून गेलो तर लोक नाव ठेवतील,
बाजी म्हणले राजे आम्ही असताना तुम्हाला लढाव लागल तर लोक
आम्हाला नाव ठेवतील त्याच काय?
राजे आम्ही तुमचे दास आहोत तुम्ही आमचे ईश्वर परमेश्वर,
आणि दासाच काम आहे ईश्वर सेवा ती आज करायला मिळतेय महाराज
माझ्या सेवेत तुम्ही का वाटेकरी होताय?
या सार्या द्रष्ट्या लोकां मध्ये आणि आपल्यातला नेमका फरक बघा
आपण त्या सर्व साक्षी परमेश्वराला म्हणतो तू जगाचा मालक
पण काम माझ कर नव्हे नव्हे आपली ईच्छाच तशी असते ,
अस नाही चालत आपल्या घरातला नोकर गादीवर बसून आणि आपण
घरदार साफ सफाई करतो का?
मग ईथे येणारे आपण सारे जर महाराजांना देव मनात असू तर आता त्यांच्या
गड किल्ल्यांची काळजी घेणे,किमान गडावर आपल्या हातून कचरा होणार नाही याची काळजी घेणे.
हे आपल काम आहे असो,

राजे निघा आता खूप उशीर होतोय ,
मात्र एक करा विशालगडावर पोहचल्यावर पाच तोफांचे बार उडवा.
तो पर्यंत मी हि खिंड लढवत ठेवतो.
अहो तोपर्यंत मरणार सुद्धा नाही काय तो दांडगा आत्मविश्वास?
ते हि हाताशी अवघे ३०० मावळे असताना आणि लढायच कुणाबरोबर तर सिद्दीच्या
जावयाबरोबर आणि त्याच्या सेने बरोबर,,,
आणि याच्या कडे सैन्य किती तर २०\२५ हजार,,

महाराजांना पुढे धाडलं आता
बाजींची तयारी सुरु झाली कुणी कुठे उभा रहायचं ?
कुणी भला चालवायचा? कुणी तलवार ?कुणी बाण ?
कुणी नुसतेच दगड गोटे मारायचे ?
जखमींना कस उचलायच त्यांना उचलताना आपल्याला तोशीश
लागणार नाही याची काळजी कशी घ्यायची?
भराभर सूचना देण्यात आल्या,आणि स्वतः बाजी ,,,

दोन हातात दोन तलवारी ,कमरेला दांडपट्टा,पाठीवर ढाल ,
जणू काही साक्षात शिवशंकरच तांडवाला सज्ज झाला होता,
आता पुढचा रणकल्लोळ उठ्ण्याआधीच सांगतो ,,

बाजींनी हि खिंड बारा तास लढवली आहे,,,

या बारा तासात रात्री १० दहा ते पहाटे पाच हि वेळ नाही बरका हे लक्षात घ्या .
यातली धावपळ नाही जमेस धरली,
रात्री पन्हाळ्या वरून निघाले आणि विशाळ गडावर पोहचले ईतक सार सोप्प गणित नव्हत,.
पहाटे पहाटे लढाईला तों फुटलं,
हरहर महादेवची गर्जना आसमंतात घुमली मावळ्यांच्या अंगात साक्षात
शिवशंकर संचारला होता,
सिद्दी मसूद २०००० हजाराची फौज घेवून ३०० मावल्यांवर तुटून पडला

आधी पायदळ मग घोडदळ एके करत अंगावर येत होत
लक्षात घ्या हे हे सार म्हणजे ऑफिसला सकाळी आलो आधी चला हाणला चहा
थोड ईकडे तिकडे केल मग काय जेवण मग जमल तर डुलकी
आणि संध्याकाळी काय तर घरी
अस नव्हत आपल्या लोकांना आराम नव्हता
पण सिद्दीच्या लोकांना आराम होता दमले कि मागे जात आराम करत
मग परत लढायला तयार हे दमले परत दुसरे तयार,,,
दुपार पर्यंत हा रणकल्लोळ चालूच होता,
बाजी आणि त्यांचे मावळे काही थकायला दमायला तयार नव्हते
मागे हटायला तयार नव्हते,

मग मात्र मसूदने एका बंदूक वाल्याला बोलावलं ,
बाजींच अक्षरशः शिवतांडव चालू होत,
बंदुकधारी आला,त्याला एका मचाणावर बसवलं,
सिद्दी मसूदला विचारतो बोला कुणावर बार टाकायचा?
त्यावर सिद्दी मसूद जे बोलला ते बखरीत हि लिहल आहे,
सिद्दी म्हणतो,
तो माधोमद उंच धिप्पाड लालेलाल झालेला मनुष्य दिसातोय ना?
ज्याच्या अंगावर आता जखमेला हि जागा शिल्लक राहिली नाही,
त्याला,त्याला गोळी घाल,बर हा बंदुकधारी जवळ जवळ मैलभर लांब
लक्षात घ्या आणि तरीही त्या वीस हजाराच्या गराड्यात हि बाजी उठून दिसत होते,
त्यांना शोधून काढून टिपण त्याला सहज शक्य झाल
कारण त्या गराड्यात ते अभिमन्यू सारखे लढत होते ,

ती सर्व काही सर्व ठरवून केलेली केलेली लढाई नव्हती,
तू मार मी अडवतो मी मारतो तू पड असला गोंधळ नव्हता,
सार्या सार्या हिंदुद्वेषी च्या जाळ्यात अडकलेल्या नरसिंहाची ती लढाई होती,
कावळा जसा चोची मारून मारून हैराण करतो तसे सारे यवन बाजींवर तुटून पडत होते,
मारलेला घाव चुकवायची संधी ते बाजींना द्यायला तयार नव्हते,
असे बाजी प्रभू रक्ताने लालेलाल झालेले त्या बंदुकधार्याला दिसले,
आणि सिद्दी मसूद आणि तो बंदुकधारी यांनी डाव साधला
ठो ठो करत गोळी घुसली थेट बाजीच्या छातीचा तिने वेध घेतला,
आणि आपल्या सैन्यात एकच गोंधळ उडाला,,

बाजी पडले
आणि त्याही परिस्थितीत बाजी उठून उभे राहिले म्हणाले घाबरू नका
मी तोफांचा आवाज ऐकल्याशिवाय प्राण सोडणार नाही,
लढत राहा लढत राहा मी आहे,
पुन्हा एकदा करकचून छातीला शेला बांधला,
पुन्हा मराठा सैन्य भिडला भीषण कापाकापी झाली ,
सारेच एका ईर्षेने लढत होते ,
त्यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी,त्यांच्या राजासाठी,मायभगिनींच्या अब्रूसाठी,
भगव्या झेंड्यासाठी,,,
बाजी उठले हातात दांडपट्टा घेतला आणि परत शत्रूला कापून काढू लागले
दिवस आता मावळतीकडे  झुकू लागला

आणि ईकडे,,   
राजे गडावर पोहचले सुर्व्याचा वेढा फोडून काढला,
तातडीने आदेश दिले आधी तोफांचा आवाज काढा,
माझी मानस लढत आहे त्यांना कळल पाहिजे मी पोहोचलो ते,,,
बाजींना कळेल मी गडावर पोहोचलो ते,,

गोळी लागलेल्या अवस्थेत बाजी लढत होते हि हसण्यावारी न्यायाची
गोष्ट नाही या लोकांची ईच्छा शक्तीच प्रबळ होती कि,
बाजीला गोळी लागलीय त्याला आता नेल पाहीजे हेच
ते वर बसलेले देव विसरून गेले होते
बाजींच्या पराक्रमाने ते ईतके अचंभित झाले होते कि क्षणभर
त्यांना वाटल आपल्यातलाच कुणी देव त्या असुरांना मारायला खाली तर
उतरला नाही ना?
आणि या गडबडीत बाजीने नकळत मागितलेल्या वराला ते हो म्हणून बसले होते,
तो वर होता,
"तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला "
लढाई चालूच होती बाजी विचारात होते महाराज पोहचले का?
कुणी तरी म्हणाल होय गडावर येजा दिसतेय महाराज पोहचले वाटत
आणि अस म्हणत असतानाच तोफांचा आवाज झाला ,

आणि बाजी आनंदाने बेहोश झाले राजे गेले गडावर पोहचले
या पेक्षा मोठ्ठा आनंद नव्हता,
हातातला दांडपट्टा खाली टाकला,आणि खाली कोसळले,
आता त्यांचा काम झाल होत,बस बस आयुष्य कृतार्थ झाल,,,
देवा आता ने खुशाल चल मी तयार आहे,,,
आणि बाजींच्या याच बेसावध पणाचा फायदा घेत
सिद्दीने अत्यंत निर्घुणपणे आपल आख्ख घोडदळ त्यांच्या अंगावर घातलं
बाजींच्या देहाची चाळण उडाली  ,,

आता मावळ्यांनी लढाई थांबवली ५\५० मावळे जे उरले होते
ते बाजूच्या जंगलात पसार झाले ,
सिद्दीला रस्ता मोकळा करून दिला ,,
सिद्दी निघाला विशाळगडी पोहचला मात्र त्याचा लक्षात आल
पन्हाळ्याला ४ महिने आता विशाळगडला ४ महिने महाराजांकडे
२७० किल्ल्ये गुणिले ४ महिने हे हे काही खर नाही याचा काही वेगळा
विचार केला पाहिजे अस विचार करत तो मागल्या
पावली पुन्हा आपल्या सासर्याकडे निघला ,,,

ईकडे महाराजांनी तोफा वाजल्या बरोबर त्यांनी निवडक मावळ्यांना
पालखी देवून बाजींना आणायला सांगितलं,
मावळ्यांनी बाजींच्या देहाचे तुकडे गोळा केले
पालखीत ठेवले आणि विशाळगडी पोहचले

महाराज आतुर झाले होते कधी एकदा बाजींना भेटतोय अस झाल होत,,
पालखी आली महाराज धावतच निघाले
तस मावळ्यांनी त्यांना अडवलं,
महाराज थांबा बाजी पालखीत नाहीत,मग?
कोण आहे आत?
महारज कडाडले,,
महाराज पालखीत बाजींच्या देहाचे तुकडे आहेत महाराज,,
हे ऐकताच महाराजांनी बाजी म्हणत आकांत केला ,,

तुम्हाला बघवणार नाही अशा अवस्थेत आहेत महाराज,
बाजी गेले आपले बाजी गेले,,
न राहवून महाराज पालखीत डोकावले
बाजींनी त्याही अवस्थेत हातात दांडपट्टा घट्ट धरलेला होता,
मस्तकावर घावचघाव झालेले दिसत होते,
बाजी तुम्ही सारे असे मला एकामागोमाग एक सोडून जावू लागले तर
हे राज्य मी कुणासाठी मिळवायचं बाजी बोला बाजी,,,
महाराज अत्यंत भावूक झाले होते ,
पण बाजी काळजी नका करू,

ज्यासाठी तुम्ही जगलात आपले प्राण पणाला लावलेत ते तुमच काम
आम्ही पूर्ण करू,,
बाजी तुमच्या रक्ताने जी घोडखिंड पावन झाली उद्यापासून
पावन खिंड म्हणून ओळखली जाईल,

गमत बघा जी शपथ महाराजांनी घेतली बाजी आम्ही तुमच अधुर काम पूर्ण करू,
त्यांचा प्रतिशोध घेवू ते महाराजांनी केल ही,,
परंतु हे भाग्य १८५७ ते १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या
क्रांतिकारकांच्या नशिबी नाही आल,
कुटुंबच्या कुटुंब खालसा झाली,अनेक जान जवान मुलीबाळी परागंदा झाल्या ,
कित्येक लोक फाशी गेले ,,आयुष्यातून उठाव लागल,

अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या बलिदान नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाल,
पण आता हरामखोरांनी बोलयला सुरवात केली रक्ताचा थेंबही न सांडता
क्रांती झाली आम्ही स्वातंत्र्य मिळवलं,,,
यापेक्षा हरामखोरी वेगळी ती काय असते?
या सार्यांच्या जखमांवर मीठ चोळल गेले,,,
रक्ताशिवाय स्वातंत्र्य ?म्हणजे ज्यांनी रक्त सांडले ते मुर्ख म्हणायचे का?
मायभूमी साठी रक्त सांडलं ते वायाच गेल,,,

अरे जा जगाचा ईतिहास तपासा
भिकामागून कुणालाही राज्य मिळाल नाही मिळवता आल नाही
भीक मागून केवळ भीकच मिळते राज्य नाही
याउलट या सार्यांना हिंसावादी ठरवण्यात आल
आम्ही भिका मागितल्या म्हणून राज्य मिळाल,,
या सार्या क्रांतिकारकांचा ईतका अपमान दुसर्या कुणी केला नसेल,,
शिरवाडकर या सार्या क्रांतीकारकांची व्यथा त्यांच्या कवितेत मांडतात
ते म्हणतात
शेवटी कळवळून त्या क्रांतीकारकांना आईलाच(मायभूमीला ) विचारावस वाटल आई चुकल का ग आमच?
फार सुंदर कविता आहे  ते क्रांतीकारक म्हणतात,,,
"ध्वज नाचविता तुझा
  गुंतले शृंखलेत हात
  तुझ्या यशाचे पवाड गाता
  गळ्यात येतात(फाशी जाव लागल)
  तव चरणांचे
  पूजन केल म्हणून गुन्हेगार
  देता जीवन अर्ध्य तुला
  ठरलो वेडे पीर,
  देशील ना पण
  तुझ्या कुशीचा या वेड्यांना आधार?
  आई वेड्यांना आधार ?
  गर्जा जयजयकार क्रांतीचा
  गर्जा जयजयकार,,,,
हे क्रांतिकारक या मायभूमीला विचारता आई हे सारे आम्हाला
वेडे ठरवत आहे तू तरी आम्हाला वेडे ठरवणार नाही ना?
हे शहाणे लोक आम्हाला वेडे ठरवत आहेत ,,
लोकांना सत्याच्या नावाखाली खोट शिकवत आहेत ,
"देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल,,,,?"
आई तूच सांग बिना खडग् आझादी ? काय याच्या बापाची पेंढ होती का?
का ईंग्रज सरकार यांच्या आईचा नवरा होता?
सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना नसती तर आता पर्यंत ५० वेळा
उपोषण करून झाल होत काय टाकल होत
तुमच्या पदरात?

असो खर बोललो तर नको त्या लोकांची नाव घ्यावी लागतात,
या साठी
यासाठी जर या सार्या विरातम्यांना शांती लाभावी असे वाटत असेल,,
मग ते महाराज असोत वा बाजी ,भगत सिंग असो वा सावरकर,
सुखदेव राजगुरू अथवा सुभाषबाबू ,,
ज्यांनी ज्यांनी या माय भूमीसाठी रक्त सांडलं त्या सार्यांसाठी
सरकार काय करेल ते माहित नाही पण ,,
या शंभू महादेवाच्या शिवतांडव भूमीवर जमलेल्या तुम्ही आम्ही
सगळे या महादेवाचे भक्त आपण आपल्या परीने वचन देवू.,,

राजे तुमच्या चरित्राचे श्रवण कवन करून गायन करून करून आम्ही किमान ईतकी
शक्ती कमवू कि तुमच्या ईतका पराक्रम शक्य नाही पण
किमान तुमच्या नावाला बट्टा लागेल अस कृत्य आम्ही आमच्या हातून घडू देणार नाही,
एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो,,
एकदा एका जंगलाला आग लागली सारे पशुपक्षी साधू संत
तिथे राहणारे आजूबाजूचे लोक ते जंगल सोडून जावू लागले.
ईतक्यात एका साधूने एका पक्षाला पाहिलं तो त्या झाडाला आग
लागली होती तरी तो त्यावर बसूनच होता,,,
त्यावर साधू त्याला म्हणतो अरे पक्षा देवाने तुला पंख दिलेत
जा उड त्याचा वापर कर झाड जळतंय तुला समजत का नाही?
त्यावर तो पक्षी बोलतो,,,
"साधू महाराज मला कळतंय तुम्ही माझ्या काळजी पोटीच मला बोलताय
सार्या जंगलाला आग लागली आहे कबुल या झाडाला मला वाचवता येणार नाही हे हि खर,,
पण मी असा कसा कृतघ्न होवू?
अहो या झाडावरच बसून मी सुमधुर फळ खाल्ली आहेत ,
याच्या सावलीत थंडगार हवेत मी झोके घेतले आहे,
याच्या पाणाची उशी करून मी त्याच्या कुशीत झोपलो आहे,
आणि आता तो जळत असतान मी कसा पळून जावू?
"फल खाये ईस पेड के गंदे किये है पात
 अब यही मेरा फर्ज है जल जाये ईसके साथ"
आता त्याच्या बरोबरच जळून जाण हीच माझी ईती कर्तव्यात आहे,,
पंचतंत्रातील एका पक्षाला हे कळल देशातल्या सार्या
पक्षांना हि अक्कल आली तर काय मजा येईल ?
अर्थात त्याच बरोबर हेही लक्षात घ्या जळून जाण हि दरवेळी ईतीकर्तव्यता
असेलच असे नाही ,मग,,,?
रोगच होवू नये म्हणून आज पासून ईलाजाला सुरवात करा
जमेल तस सैनिकी शिक्षण घ्या ,रोज १ तास व्यायाम करा
किमान वेळात वेळ काढून किमान १० सूर्य नमस्कार घातल्या शिवाय अन्नाला हात लावणार नाही
अस ठरवा
कारण लक्षात घ्या आज मुसलमान मुस्लीम लीग म्हणेल त्याला सरकारला हो म्हणव लागतंय
कारण त्यांनी उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना याच महत्व ओळखाल आहे
त्यांना त्यांच्या धर्माप्रतीची कर्तव्य माहित आहेत त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत,
आणि आम्ही आमच्या धर्माची टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानतो,,
जय हिंद जय महाराष्ट्र,,, 



Panhalgad to Vishalgad Trek 2012
Jul 1, 2012
by Shivashourya Trekkers
Shivashourya Trekkers organised 3rd Successful Panhalgad to Vishalgad Expedition with 80 'Mavale"
 https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=103673941569844814606&target=ALBUM&id=5762463841297645361&authkey=Gv1sRgCLP4n_Cwq7yXEg&feat=email

Friday 9 March 2012

सुधागड


ठरल्या प्रमाणे १७ तारखेला आम्ही रात्री १२ वाजता निघालो आणि पहाटे पहाटे सुधागडला पोहचलो 

सकाळ असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते.
गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी.

सुधागड किल्ल्याला ऐतेहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील 
म्हणतात. सुधागड म्हणजे भोर 
संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार 
प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या 
गडाला भोरपगड असेही म्हणत 
असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे 
संस्थापक श्री शिवछत्रपतींचा 
पदस्पर्श या गडाला झाला आणि 
याचे नाव सुधागड ठेवले गेले. या 
गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड 
विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा 
आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. 
या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, 
ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा 
देखील तितकाच जुना किल्ला असावा. 
पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. 
याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली 
हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 
'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी 
भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर 
चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास 
संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. 
बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून 
किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार 
कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे 
भोरपगडावरूनसुधागड असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व 
औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या 
अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी 
आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या 
सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या 
परली गावात हत्तीच्या पायी दिले.
पहाण्यासारखी ठिकाणे

या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर 
पाण्याचे अनेक तलाव 
आढळतात.गडावर पंत सचिवांचा 
वाडा आहे.तसेच भोराई देवीचे 
मंदिर 
आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. 
आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात 
अनेक प्रकारची औषधी वनस्पती 
आढळतात. गडावरील पंत 
सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे 
गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. 
सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई 
देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे 
पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 
टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट 
मात्र आता अस्तित्वात नाही.
  • पाच्छापूर दरवाजा : या 
  • दरवाज्यातून गडावर 
  • शिरल्यास थोडे चढल्यावर 
  • आपण एका पठारावर 
  • पोहोचतो. पठाराच्या डावीकडे 
  • सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच 
  • धान्यकोठारं,भाडांचे 
  • टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ 
  • आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
  • गडावरील टकमक टोक : 
  • वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. 
  • ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. 
  • या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. 
  • या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा 
  • घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

चोर वाट 
  • दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे 
  • या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची 
  • रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन 
  • भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या 
  • द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. 
  • गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट 
  • विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
    भोराई देवी
  • सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
  • नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.
किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ २\२.५ तासात किल्ला सर् केला. आर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते, चढायला खुपच सोप्पी आणि सेफ अशी शिडी आहे.
फोटो काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. काही वेळातच आम्ही वर आलो. किल्ला तसा खूप प्रशस्त आहे. तसेच किल्ल्यावर जुने बांधकाम् आढळते. वरती टकमक टोक, शिव मंदिर, पाण्याचे तळे, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आहे. किल्ल्याला बुरुज आणि चोरवाटा आहेत.माहिती मिळाल्याप्रमाणे दरवर्षी सुधागडावर भोराई देवीची यात्रा होते.

सकाळी अंदाजे१० वाजता वरती असलेल्या वाड्यात चहा आणि जेवण केले. (वर वाड्यात चहाची सोय होते.)
आणि गड फिरायला निघालो दुपारी साधारण २\३ वाजता जेवण संध्याकाळी टकमक आणि सूर्यास्त आणि
रात्री मुक्काम करून सकाळी गड उतरलो
मग पाली गणेश दर्शन आणि उंबरखिंड पाहून संध्याकाळी घरी परतलो
येथे सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा 
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=108997132899458184080&target=ALBUM&id=5712033364431272353&authkey=Gv1sRgCOiAxoHKy9qMHQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
येथेहि सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा

 https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=103673941569844814606&target=ALBUM&id=5711251137954960897&authkey=Gv1sRgCNblyY_g5vzXZQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.

Monday 16 January 2012

जव्हार-भूपतगड


||श्री शिवरायाय नमः ||
जिथे साक्षात छत्रपतींनीही जायच्या आधी विचार केला असता
तिथे ईतर मुसलमान राजांनी स्वप्नात सुद्धा तिथे जाण्याचा विचार केला नेसल असा हा गड भूपत गड ,,,
मुंबई जवळ असूनही दुर्गम भाग सहज जावू याचा विचारही कुणी
करू नये असा हा भूपत गड,,
ईथे खरतर मला गडाची माहिती देण्यापेक्षा ईतर माहिती द्यावीशी वाटते
"माझ्या कडे  फाटके बूट होते वापरायला आणिते फाटके बूट
घालायला धड पाय हि नाहीत अशी अवस्था असलेला हा भूपत गडचा
जव्हार मधील दुर्गम भाग,,,
आपल्याकडे फाटके असले तरी कपडे आहेत घायला पण मुंबई जवळच्या त्या
साऱ्या आदिवसी पाड्यातील लोकांकडे ते कपडेही नाहीत
आपल्या कडे शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत त्यांच्या कडे त्या मुलभूत गरजा भागवायला महाग आहेत
आपल्या कडे दात आणि चणे हि आहेत .
त्यांच्या कडे दातही नाही आणि चणेही नाहीत आणि तरीही आम्ही जेव्हा फिरलो
मुकबधीर शाळेच्या प्रमिला कोकड ज्यांचा या कार्याचा गौरव
देशाच्या राष्ट्रपतीं "प्रतिभा ताई पाटील "हातून झाला आहे,
तिथल्या मुकबधीर शाळेत तेव्हा असे वाटले आपणच खरे मुकबधीर आहोत
आपल्या जवळच्या जिल्ह्यात ह्या मुलभूत गरजा नाहीत आणि
आपण मूक राहतो आणि त्यांच्या जाणीवां विषयी बधीर हि आहोत ,,,
त्यांचे कलाकुसूर करणारे हात पहिले कि आपल्याला आपल्याच हातांची लाज वाटते
आपल्या हात किमान त्यांच्या साठी देवाकडे प्राथना करण्यासाठी साठी जरी जोडले
तरी जन्माच सार्थक होईल असे वाटते ,,
आणि देवबांधचे साठे काका वयाची ६० ओलांडली तरी नव्या उत्साहाने आम्हाला
ते करत असलेल्या कार्याची माहिती करून देत होते आणि हे सार सांगताना कुठेही अस जाणवत नव्हत
कि आमच्या कडे मदत मागत आहेत ,,,
वर आम्ही तिथे दुपारी पोहोचलो तर आमच्या साठी तिथे मांडव घातला होता
सतरंज्या अंथरल्या होत्या थंडगार पाण्याची व्यवस्था होती
ज्या गावात रात्री मुक्काम केला होता
तिथे तर आम्ही येणार म्हणू रस्ता स्वच्छ केला होता
पाण्याने शिंपडून सरळ केला होता
आणि आपण सारे अनास्थी ,,,,
स्वातंत्र्याच्या ६० वर्ष नंतरही त्यांच्या तेथील आदिवासींच्या जीवनात
स्वातंत्र्याचा सूर्य पोहचलेला नाही हे तिथे गेल्यावर कळत,,,
चार बांबुचे पाल हीच त्यांची मालमत्ता ,

शिकवायला धड शिक्षणही नाही त्यांच्याच गावातील सर्वात जास्त
म्हणजे १२ पास झालेला माणूस हाच त्यांचा शिक्षक ,,
आरोग्य सुविधा कशाशी खातात हे त्यांना माहित नाही,,
असा हा भूपतगड आणि त्याचाह परिसर ईकडा तरी अनुभवावा
जव्हार मोखाडा मार्गावर देवबांध,,,
जव्हार किंवा खोडाल्याहून बसने ईथे याव पुढे नदी ओलांडून डावीकडे
एक कच्चा रस्ता फुटतो मग आडोशी गाव,,,
तिथून पुढे पाथर्डी आणि गावात शिरल कि भूपत गडच मनोहारी दर्शन होत ,,
असे ३\४ वेळा नदी ओलांडावी लागते,
तिसर्यांदा नदी ओलांडली कि दिसते कुर्लोदची वाडी कुर्लोद हे भूपत गडच्या
पायथ्याच गाव ईथूनच झाप या गावी हि जाता येत,
तास जव्हार हून थेट कुर्लोद्लाहि येत येत,
गडाच्या टोकाकडे चालत निघाव
वर पोहचल्यावर उजव्याबाजूला एक उंचवटा दिसतो,
थोड पुढ गेल्यावर काही जोती व त्यानंतर देवाची खोपी दिसते,
त्याला लागूनच गडाच्या मूळच्या दरवाजाचे अवशेष दिसतात,
त्याच्या थोड पुढे लहानसं तळ दिसत हे सार बघून मग मागे वळायच कुर्लोदची
वाट सोडून झाप कडे चालू लागायचं खाली उतरल्यावर झाप हून
एसटी ने जव्हार मग मुंबई गाठायची
मुंबईला आलो खरा पण तिथले आदिवासी काही डोक्यातून जात नव्हते
खरतर मुंबई जवळ आदिवासी पाडा ,गाव,जिल्हा  ? हेच मुळात मान्य होत नाही,
तिथे हे सारे आदिवासी राहतात ज्याच्याकडे वीज नाही पाणी नाही
पण मनाची श्रीमंती ईतकी आहे कि विचारू नका शब्द नाहीत .

ईतिहासाच हे छुप पान उघडलं गेल दुर्लक्षित भाग समोर आणला
अशा ह्या भूपत गडाची मोहीम शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राबवली गेली ,
आणि त्याला श्री.श्रीदत्त राउत यांनी मोलाची साथ दिली
धन्यवाद शतशः धन्यवाद .

खालील  लिंक वर क्लिक केले तर जव्हार भूपतगडाचे  फोटो दिसतील.
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5690886827952087585&authkey=Gv1sRgCNmqg-WuqtbuBw&feat=एमैल