Friday, 9 March 2012

सुधागड


ठरल्या प्रमाणे १७ तारखेला आम्ही रात्री १२ वाजता निघालो आणि पहाटे पहाटे सुधागडला पोहचलो 

सकाळ असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते.
गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी.

सुधागड किल्ल्याला ऐतेहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील 
म्हणतात. सुधागड म्हणजे भोर 
संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार 
प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या 
गडाला भोरपगड असेही म्हणत 
असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे 
संस्थापक श्री शिवछत्रपतींचा 
पदस्पर्श या गडाला झाला आणि 
याचे नाव सुधागड ठेवले गेले. या 
गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड 
विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा 
आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. 
या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, 
ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा 
देखील तितकाच जुना किल्ला असावा. 
पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. 
याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली 
हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 
'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी 
भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर 
चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास 
संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. 
बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून 
किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार 
कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे 
भोरपगडावरूनसुधागड असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व 
औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या 
अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी 
आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या 
सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या 
परली गावात हत्तीच्या पायी दिले.
पहाण्यासारखी ठिकाणे

या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर 
पाण्याचे अनेक तलाव 
आढळतात.गडावर पंत सचिवांचा 
वाडा आहे.तसेच भोराई देवीचे 
मंदिर 
आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. 
आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात 
अनेक प्रकारची औषधी वनस्पती 
आढळतात. गडावरील पंत 
सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे 
गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. 
सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई 
देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे 
पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 
टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट 
मात्र आता अस्तित्वात नाही.
  • पाच्छापूर दरवाजा : या 
  • दरवाज्यातून गडावर 
  • शिरल्यास थोडे चढल्यावर 
  • आपण एका पठारावर 
  • पोहोचतो. पठाराच्या डावीकडे 
  • सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच 
  • धान्यकोठारं,भाडांचे 
  • टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ 
  • आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
  • गडावरील टकमक टोक : 
  • वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. 
  • ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. 
  • या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. 
  • या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा 
  • घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

चोर वाट 
  • दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे 
  • या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची 
  • रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन 
  • भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या 
  • द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. 
  • गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट 
  • विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
    भोराई देवी
  • सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
  • नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.
किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ २\२.५ तासात किल्ला सर् केला. आर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते, चढायला खुपच सोप्पी आणि सेफ अशी शिडी आहे.
फोटो काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. काही वेळातच आम्ही वर आलो. किल्ला तसा खूप प्रशस्त आहे. तसेच किल्ल्यावर जुने बांधकाम् आढळते. वरती टकमक टोक, शिव मंदिर, पाण्याचे तळे, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आहे. किल्ल्याला बुरुज आणि चोरवाटा आहेत.माहिती मिळाल्याप्रमाणे दरवर्षी सुधागडावर भोराई देवीची यात्रा होते.

सकाळी अंदाजे१० वाजता वरती असलेल्या वाड्यात चहा आणि जेवण केले. (वर वाड्यात चहाची सोय होते.)
आणि गड फिरायला निघालो दुपारी साधारण २\३ वाजता जेवण संध्याकाळी टकमक आणि सूर्यास्त आणि
रात्री मुक्काम करून सकाळी गड उतरलो
मग पाली गणेश दर्शन आणि उंबरखिंड पाहून संध्याकाळी घरी परतलो
येथे सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा 
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=108997132899458184080&target=ALBUM&id=5712033364431272353&authkey=Gv1sRgCOiAxoHKy9qMHQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
येथेहि सुधागडचे फोटो पहा 
खालील लिंक वर क्लिक करा

 https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=103673941569844814606&target=ALBUM&id=5711251137954960897&authkey=Gv1sRgCNblyY_g5vzXZQ&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.

No comments:

Post a Comment